अहमदनगर : अर्बन बँकेच्या पारनेर शाखेच्या इमारतीचे शनिवारी लोकार्पण

0

अहमदनगर : 107 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेच्या पारनेर शाखेच्या नूतन अद्ययावत वास्तूचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. 4 नोव्हेंबर 2017 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा, उत्पादन शुल्क मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते व आ. विजय औटी यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन खा. दिलीप गांधी यांनी दिली.
अर्बन बँकेच्या अनेक शाखा वर्षानुवर्षांपासून जिल्ह्यासह विविध ठिकाणी निरंतर सेवा देत आहेत. बदलत्या काळानुसार प्रशस्त जागेत आधुनिकतेचा अवलंब करुन सेवा देणे ही काळाजी गरज असल्याने तसेच खातेदार ग्राहकांना सर्वोत्तम सेवा-सुविधा पुरविणेच्या हेतूने आम्ही शाखांचे नुतनीकरण एकाचे डिझाईनमध्ये करीत आहोत, असे खासदार गांधी म्हणाले.
यापूर्वी बँकेच्या श्रीगोंदा, मिरजगाव, बेलापूर, श्रीरामपूर, आश्‍वी, वांबोरी, शेवगाव, पुणे, गुलटेकडी, बालमटाकळी व पाथर्डी या शाखांचे नुतनीकरण करण्यात आले असून पारनेर शाखा 23 वर्षांपासून पारनेर व लगतच्या परिसराची कामधेनू बनली आहे. 4 नोव्हेंबर गुरुनानक जयंतीनिमित्ताने योग चालून आला असल्याचे त्यांनी नमुद केले.
या सोहळ्यास माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजीत झावरे, पंचायत समिती सभापती राहुल झावरे, पारनेर नगरपंचायत नगराध्यक्षा सीमाताई औटी, उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, उज्ज्वलाताई ठुबे, शिवसेना तालुकाप्रमुख निलेश लंके, भाजाप अध्यक्ष विश्‍वनाथ कोरडे, मार्केट कमिटी चेअरमन प्रशांत गायकवाड उपस्थित राहणार आहेत, असे उपाध्यक्ष नवनीत सुरपुरीया यांनी सांगितले. अर्बनचे वैशिष्ट्य म्हणजे संबंधीत शाखेच्या व प्रत्येक शाखेच्या आनंद सोहळ्यास शाखेचे प्रथम सभासद, प्रथम ठेवीदार व प्रथम कर्जदार यांनाही सन्मानपूर्वक बोलावणेत येते. पारनेरच्या लौकीकात भर घालणार्‍या या अद्ययावत नुतनीकरण वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यास सभासद, खातेदार व हितचिंतकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन स्थानिक संचालक अशोक माधवलाल कटारिया व सर्व संचालक मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

*