अहमदनगर : उद्धव अ‍ॅकेडमीच्या अनुष्काचे राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत यश

0

शिक्षणाबरोबर खेळासही प्रोत्साहन दिले पाहिजे : प्राचार्या निशिता जाधव

अहमदनगर (नगर टाइम्स डिजिटल) : विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना आपल्यातील कला-गुणही जोपासले पाहिजे. त्यासाठी संस्थेच्यावतीने त्यांना सर्वोतोपरि मदत केली जात आहे. त्यामुळे उद्धव अ‍ॅकेडमीचे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच खेळामध्ये जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. अनुष्का तुपे हीने मिळविलेले यश ही इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारे आहे, असे प्रतिपादन उद्धव अ‍ॅकेडमीच्या प्राचार्या सौ.निशिता जाधव यांनी केले.
कल्याणरोड, जाधवनगर येथील उद्धव अ‍ॅकेडमीची इ.7 वीमधील विद्यार्थीनी अनुष्का तुपे हीने मिनी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल चॅम्पयनशीप राज्यस्तरीय सांगली येथे झालेल्या स्पर्धेत पुणे विभागीय संघाकडून खेळतांना चमकदार कामगिरी केल्याबद्दल तिचा संस्थेच्यावतीने प्राचार्या निशिता जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अ‍ॅड.जयंत जाधव, व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष शैलेश गवळी, अश्विनी तुपे, योगीता पवार, क्रीडा शिक्षक सुनिल मोहिते आदि उपस्थित होते.
अनुष्का तुपे हीने सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन अंतर्गत झालेल्या स्पर्धेत संघात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. यापूर्वीही तिने मनपा आयोजित आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धामध्ये शाळेच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला होता.

LEAVE A REPLY

*