विभागीय साहित्य संमेलन विशेष : तृतीयपंथीय दिशाने दिली संमेलनाला दिशा

0

111 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मिळाले व्यासपीठ

अहमदनगर : विभागीय साहित्य संमेलनास तृतीयपंथीय साहित्यिक, कवी दिशाच्या मुलाखतीने संमेलनासच एक प्रकारे दिशा दिली. साहित्य संलेनाच्या 111 वर्षांच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथीय कवीला संधी देण्यात आली होती. तिच्यामुळे या घटकातील जीवनसंघर्ष लोकांना समजला. समाजात स्त्री, पुरूष असे दोनच जाती मानल्या जातात. मात्र, तिसर्‍या समाजाला अद्यापि कोणतीच प्रतिष्ठा नाही. खरे तर हा बदल निसर्गाने केला नाही. तर पितृसत्ताक पद्धतीने केला आहे. त्यांच्या प्रतिष्ठेसाठी काम करीत असल्याचे दिशाने सांगितले. तिच्या मुलाखतीला प्रचंड गर्दी झाली होती.

दिशाची समाजाबद्दलची निरीक्षणे अफाट होती. तिने मांडलेले मुद्दे उपस्थितांनाच नव्हे संपूर्ण समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहेत. कोणत्याही घरात जन्माला आलेल्या हिजड्याला प्रतिष्ठा नाही. हिजडा ही आपल्या समाजात शिवी समजली जाते. मात्र, हा एक जीवनप्रवाह आहे. ती एक संस्कृती आहे. त्यातूनच हा शब्द तयार झाला आहे. त्याला मान्यता मिळालीच पाहिजे, असे मत दिशाने व्यक्त केले.
हिजड्यांच्या संस्कृतीतील नाती पवित्र असतात. त्याला कोणतीही बंधने नसतात. ही गुरू शिष्य-परंपरा आहे. ती प्रतिष्ठीत समाजाल समजली पाहिजे. हिजड्यांचे जगणे मान्य केले तरच हा समाज प्रगत झाल्याचे मानता येईल.
साहित्याविषयी बोलताना दिशा म्हणाली की, भाषाही जातीवाद करते. स्त्री-पुरूष असा भेद करते. साहित्यिकांनी आपली प्रतिके आणि प्रतिमा बदलल्या पाहिजेत. कमजोर प्रतिमांना स्त्रीवाचक संबोधले जाते. तर बलदंड वस्तूंना पुरूष मानले जाते. हा साहित्यिकांकडून होणारा जातीवादच आहे.
आपला समाज ढोंगी आहे. जन्माला येणारी व्यक्ती कोणतेच लिंग घेऊन येत नसते. तिला आपण ठरवतो हा पुरूष-ही स्त्री. एखाद्याला स्त्री व्हायचे असेल तर आपल्याकडे सोय नाही. बाई पुरूषासारखी वागली तरी चालत नाही आणि पुरूषाने बाईसारखे वागणे रूचत नाही,असेही दिशा म्हणाली.

  • ट्रान्स जेंडरबाबत कोणीच बोलत नाही  समाजाला अद्यापि स्त्रीयांचेच प्रश्‍न सुटलेले नाहीत. मग ते ट्रान्स जेंडरबाबत काय बोलणार? लेस्बियन संस्कृतीची तर दूरची गोष्ट. तृतीयपंथीय म्हणून मी जे काही भोगले तेच साहित्यात उतरविते. ज्ञानी लोक त्याला साहित्य समजतात. जोपर्यंत मी व्यवस्थेला मान्य आहे ते बोलते तोपर्यंतच मी जिवंत आहे. जेव्हा व्यवस्थेला छेद देईल, त्यावेळी माझा खून तरी होईल किंवा मला संपविले जाईल, असे स्पष्टोक्तीही तिने दिली.

 

LEAVE A REPLY

*