शिर्डी : साईमंदिरात बुके बॅन

0

शिर्डी- शिर्डीतील साईबाबांच्या दरबारात भक्तांना येथून पुढे पुष्पगुच्छ नेता येणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव साई संस्थानाने मंदिरात पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वीच मंदिरात नारळ घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. समाधी मंदिराच्या प्रवेशद्वारावर वापरलेले पुष्पगुच्छ पुन्हा विक्रीला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले. तसेच अनेक भाविक पुष्पगुच्छ दुरुनच साईंच्या मूर्तीवर फेकत असल्याचे चित्र नेहमीच दिसत होते. अपप्रवृत्तीच्या पुष्पगुच्छ विक्रेत्यांना आळा घालण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांनीही संस्थानाकडे केली होती. हे प्रकार थांबवण्यासाठी आणि सुरक्षेच्या मुद्यावरुन अखेर पुष्पगुच्छ नेण्यास बंदी घालण्याचा निर्णय संस्थानकडून घेण्यात आला आहे.

नारळ, पुष्पगुच्छ नेण्यावर बंदी असली तरी मात्र फुलं, हार आणि प्रसाद घेऊन जाण्यास मात्र कोणतीही बंदी नसेल, अशी माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*