पारनेर रेप, मर्डर केस : तिघांना कोर्टाने धरले दोषी; उद्या फैसला

0

पारनेर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने 2014 मधील या प्रकरणावर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे. दोषी ठरविलेल्या तिघांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.

संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे असे दोषी ठरवण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. संतोष लोणकर, मंगेश लोणकर आणि दत्ता शिंदे या तिघांवरही बलात्कार आणि हत्येसह सहा आरोप ठेवण्यात आले होते. 22 ऑगस्ट 2014 साली लोणी मावळा गावात दहावीत शिक्षण घेणार्‍या मुलीवर अत्याचार करुन हत्या करण्यात आली होती. शाळा सुटल्यावर घरी येताना अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.

 

LEAVE A REPLY

*