शिर्डी : राष्ट्रीय डान्स आणि म्युझिक चॅम्पियनशिप 2017 स्पर्धेचे आयोजन

0
अहमदनगर : भारतात मागील काही काळात विविध नृत्य प्रकार चांगलेच लोकप्रिय होत असून दूरचित्रवाणीवरील रिऍलिटी शोमुळे नृत्य प्रकारांत नैपुण्य मिळवणाऱ्यांची डान्सची क्रेज वाढत आहे. या अनुशंगाने भारतीय डान्स ऍण्ड म्युझिक असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीने 3 री राष्ट्रीय डान्स ऍण्ड म्युझिक चॅम्पियनशिप 2017 दि 7  ते 9 नोव्हेंबर या कालावधील शिर्डीत आयोजित करण्यात आली आहे.
शिर्डीतील वॉटर पार्क जवळील हॉटेल सिल्व्हर ओक येथे ही स्पर्धा होणार असल्याची माहिती अहमदनगर डिस्ट्रिक्ट डान्स ऍण्ड म्युझिक असोसिएशनचे जिल्हा सचिव सागर अलचेट्टी यांनी दिली.
लहान मुलांमधील गुणवत्ता हेरून त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वैयक्तीक, जोडी आणि ग्रुप अशा प्रकारांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 9 ते 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
क्लासिकल, फोक आणि वेस्टर्न अशा नृत्य प्रकारासह गायनाचीही स्वतंत्र स्पर्धा होणार आहे. एकूण 5 गटात ही स्पर्धा होत असून विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह पदक तसेच प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे.
नगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे राज्य सचिव नितीन मन्वर, स्पर्धा संयोजक एस.एम.झांबरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*