अहमदनगर : मर्चंट बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड

0

संजीव गांधी, विजय कोथिंबीरे यांना पुन्हा संधी

अहमदनगर  : अहमदनगर मर्चन्ट बँकेच्या अध्यक्ष पदी संजीव गांधी यांची तर उपाध्यक्ष पदी विजय कोथिंबीरे यांनी फेरनिवड करण्यात आली. जिल्हा निबंधक अनिलकुमार दाबशेडे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. दोघांनीही गतवर्षी दिलेली योग्यरितीने पार पाडली. त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांची फेरनिवड केल्याचे संस्थापक अध्यक्ष हस्तीमल मुनोत यांनी सांगितले.
अध्यक्ष पदासाठी गांधी यांच्या नावाची सूचना मोहन बरमेचा यांनी मांडली त्यास अनिल पोखरणा यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी कोथंबीरे यांच्या नावाची सूचना किशोर गांधी यांनी मांडली त्यास अजय मुथा यांनी अनुमोदन दिले.
संजीव गांधी हे प्रख्यात कर सल्लागार असून जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोशिएशनचे संचालक, टॅक्स बार असोशिएशनचे सचिव, हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. कोथंबीरे हे प्रसिध्द व्यापारी असून जल्हा नागरी सहकारी बँक्स असोशिएशनचे स्वीकृत तज्ज्ञ संचालक, शहराचे दैवत विशाल गणपती मंदिराचे सहखजिनदार, पांजरपोळ गोरक्षण संस्थेचे निमंत्रीत सदस्य आहेत.
हस्तीमल मुनोत म्हणाले, मी बँकेच्या प्रगतीचे स्वप्न पाहिले आहे. गांधी व कोथंबीरे यांच्यावर गत वर्षी सोपविलेली जबाबदारी त्यांनी योग्य रितीने पार पाडली. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून त्यांची फेरनिवड करण्यात आली. बँकेचे भविष्यात शेड्युल्ड बँकेत रुपांतर करणे, खातेदारांना नेटबॅकिंग सुविधा, स्वत:ची आर.टी.जी.एस व एन.ई.एफ.टी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाखा विस्ताराचा पाठपुरावा गांधी व कोथंबीरे करतील असा विश्‍वास मुनोत यांनी व्यक्त केला.
निवडीनंतर गांधी म्हणाले, हस्तीमल मुनोत हे सहकारातील माझे गुरू आहेत. त्यांनी टाकलेली जबाबदारी सार्थपणे पूर्ण करू. मागील टर्ममध्ये अपूर्ण राहिलेल्या जबाबदारी पूर्ण करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. कोथबीरे यांनी बँकेच्या प्रगतीसाठी कटिबध्द असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

*