अहमदनगर : मोेदींमुळे वाढली खादी

खादी ग्रामोद्योग मंत्रालयाचे निरीक्षण

0

अर्जुन राजापुरे @ अहमदनगर :  नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर देशात असहिष्णूतेचे वातावरण वाढत असल्याची टीका होते. ते गांधीजींच्या विचारांना हरताळ फासत असल्याची चर्चा जोर धरतेय. मात्र, महात्मा गांधी यांच्या खादीला त्यांनी ग्लॅमर मिळवून दिले. ते स्वतः खादी वापर असल्यामुळे या कपड्यांचा देशात मोठ्या प्रमाणात खप वाढला आहे. खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या अधिकार्‍यांचे हे निरीक्षण आहे.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य, खादी व ग्राम उद्योग मंडळ यांच्या वतीने महाखादी यात्रेच्या माध्यमातून दि.9 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर ही लोक चळवळ सुरू झाली. ही महाखादी यात्रा बुधवार दि.8 ते रोजी सावेडी येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह येथे सुरू झाली आहे. ही यात्रा उद्या शुक्रवार दि.10 नगरकरांना सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत या महोत्सव सुरू राहणार आहे. महाखादी यात्र दि. 9 ऑक्टोबर पासून मुंबई येथील राजभवन येथून सुरू झाली असून या यात्रेचा समारोप दि.20 डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवन येथे होणार आहे. ही यात्रा मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर येथून या यात्रेचे नगर येथे काल आगमन झाले आहे, पुढे ही यात्रा नाशिक, धुळे, जळगांव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, मार्ग नागपूर येथे समारोप होणार आहे.
या महोत्सावात नगरकरांना सुतकताई यज्ञ, महात्मा गांधी यांच्याय काळातील चारखे, अद्यावत चरखे, अद्ययावत चरखे उद्योगांचे प्रात्यक्षिक पाहता येत आहे, त्याच बरोबर ग्रामउद्योग वस्तुंची विक्री, स्टॉल लावण्यात आले आहे. तसेच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, बेरोजगार, शेतकरी, कारागीर, यांना मंडळाच्या विविध योजनांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या महोत्सावात विविध चरख्यावर तयार केलेल खादी, विविध रंगातील कपडे, तसेच या मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेऊन तयार केलेल्या विविध उत्पानेचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले आहे, तसेच मधुमक्षीका पालन या उद्योगातून तयार केलेले मध, विविध औषधी वनस्पती, तसेच विविध वस्तू या ठिकाणी पाहण्यास उपलब्ध करून दिले आहे.

या प्रदर्शनात एकूण दहा स्टॉल लावण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पुणे, शिर्डी, अमरावती, नगर, महाबळेश्वर सह विविध जिल्ह्यातील मंडळानी यात सहभाग घेतला. या महोत्सावाला सावेडी, पाईपालईन रोड, प्रोफेसर कॉलनी, तसेच विविध भागातील नागरिक, युवक मोठ्या संख्येने या महोत्सावाल भेट देत आहे.

या महाखादी यात्रेच्या माध्यमातून खादी व ग्रामोद्योगाला प्रोत्साहान, खादी व ग्रामोद्योगी वस्तू वापराबाबत जनजागृती करणे,खादी ग्राम उद्योग मंडळाच्या विविध योजनांचा प्रचार करणे, खादी व मधउद्योग प्रात्यक्षिक बघ्णयाची संधी उपलब्ध करून देणे, महाखादी ब्रॅण्ड प्रसिध्दी, तसेच या उद्योगाच्या माध्यमातून खादीच्या उत्पादनान बाजारपेठ तयार करणे या लोक चळवळीच्या माध्यमातून ही यात्रा सुरु झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*