कविता संवेदनशील मनाचा ठाव घेणारी : चंद्रकांत पालवे

0

 कवी संमेलनात मोठ्या संख्येने कवींचा सहभाग

अहमदनगर : समाजामध्ये घडणार्‍या विविध घटनेवर आधारित कवीने आपल्या भाषा शैलीत तयार केलेली कविता ही आपल्या संवेदनशील मनाचा ठाव घेणारी असते. कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम होत असते. ग्रामीण साहित्य व महानगर कवी यांच्यामध्ये सांगड घालून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणार्‍या कविता असतात. शासन, निसर्ग, प्रेम, कौटुंबिक यावर कविता सादर केल्या जातात. कवितेच्या माध्यमातून समाजाला चालू स्थितीतील घडामोडींबद्दल आकलन होते, असे प्रतिपादन कवी चंद्रकांत पालवे  यांनी केले.अहमदनगर (प्रतिनिधी) – समाजामध्ये घडणार्‍या विविध घटनेवर आधारित कवीने आपल्या भाषा शैलीत तयार केलेली कविता ही आपल्या संवेदनशील मनाचा ठाव घेणारी असते. कवितेच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे मोठे काम होत असते. ग्रामीण साहित्य व महानगर कवी यांच्यामध्ये सांगड घालून वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणार्‍या कविता असतात. शासन, निसर्ग, प्रेम, कौटुंबिक यावर कविता सादर केल्या जातात. कवितेच्या माध्यमातून समाजाला चालू स्थितीतील घडामोडींबद्दल आकलन होते, असे प्रतिपादन कवी चंद्रकांत पालवे  यांनी केले.महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ महोत्सव 2017 मध्ये कवी संमेलनात कवी चंद्रकांत पालवे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंडे, आकाशवाणी केंद्रप्रमुख बाबासाहेब खराडे, कवी प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. राजेंद्रसिंह परदेशी, डॉ. लिला गोविलकर, डॉ. क्रांतिकला अनभुले, प्रा. मेधा काळे, बाळासाहेब आरगडे, ऋता ठाकूर, स्मिता भुसे, एन. पी. दिवाण, भाऊसाहेब सावंत, शर्मिला गोसावी, केशव भणगे, बाळासाहेब आरगडे, गणेश मरकड, दिलीप शहापूरकर, बाळासाहेब चव्हाण, कैलास दौंड, भूषण देशमुख, आशा साठे, बेबीताई गायकवाड, डॉ. कमर सुरूर, अशोक निंबाळकर, सुधीर पाठक, प्रा. बापू चंदनशिवे, प्रमोद येवले, मनीषा पटेकर, अशोक शर्मा, चंद्रकांत कर्डक, बबनराव लांडगे, दिगंबर गोंधळी, गंगाधर पंडित, स. रा. गोरे आदी उपस्थित होते. या कवी संमेलनात मोठ्या संख्येने कवींनी सहभागी होऊन बहारदार एकसे बढकर एक कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी मुंडे म्हणाले की, जिल्हा ग्रंथालय विभागाच्यावतीने दरवर्षी कवी संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा आयोजित कवी संमेलनात सुमारे 65 कवींनी सहभाग नोंदवून अनेक विविध विषयांवरील कविता सादर केल्या. दोन दिवस आयोजित ग्रंथ महोत्सवात विविध भरीव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वच कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.

पुस्तकांवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत : पुस्तकांवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत  संत तुकाराम महाराज, शिवाजी महाराज आदी पारंपारिक वेशभूषा केल्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे संमेलनात रंगत वाढली. बॅण्ड पथकाच्या सुरेल वातावरणाने वातावरण मंत्रमुग्ध बनले होते. ग्रंथोत्सवात सोलापूर, पुणे, नगर, औरंगाबाद येथील पुस्तक प्रकाशकांनी स्टॉल लावले होते. या ठिकाणी 10 ते 50 टक्क्यापर्यंत पुस्तकांवर सवलत आहे. सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, मसापचे मिलिंद जोशी, सुनील पवार, जयंत येलूलकर, संमेलनध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे, प्रशांत गडाख यांच्यासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील साहित्यिक मोठ्या संख्याने उपस्थितीत होते.

पूर्व संध्येला रंगली काव्य संध्या : मसापच्या विभागीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत काव्य संमेलन रंगेल. यात तब्बल 60 हून अधिक कवींनी सहभाग घेतला. सायंकाळी सात वाजता सुरू झालेली काव्य संध्या मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. प्रा.मेधा काळे, लिला गोविलकर, टी.एन.परदेशी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थितीत होते. संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत, शर्मिला गोसावी, संदीप काळे यांनी केले. संमेलनात प्रा.चं. वि. जोशी, अरविंद, बाम्हणे, बेबीताई गायकवाड आदींनी कविता सादर केल्या. पुणे, सोलापूर, आदींसह विविध ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कवींनी सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

*