अहमदनगर : परिवर्तनाची सुरूवात नगरमधून!

0

संग्राम जगताप कार्यकर्ता जपणारा माणूस

अहमदनगर : फेकू आणि फसवं भाजप सरकार असल्याचं जनतेला आता कळलं आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत परिवर्तन अटळ असून त्याची सुरूवात नगरमधून होत आहे. आमदार संग्राम जगताप हे कार्यकर्ते जपणारा माणूस असल्याचे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जगताप यांच्या कार्याचे कौतूक केले.
मुंडे यांच्या हस्ते भिंगार, बोल्हेगाव, सावेडीत राष्ट्रवादी शाखांचे उद्घाटन करण्यात आले. भिंगार, हातमपुरा व बोल्हेगाव येथे त्यांच्या जाहीर सभाही झाल्या. माजी आमदार दादा कळमकर, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, शहर अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माजी महापौर अभिषेक कळमकर, भिंगार छावणी मंडळाचे उपाध्यक्ष मुसा सय्यद, भिंगार विभागाचे अध्यक्ष संजय खताडे, नगरसेवक अरिफ शेख, अविनाश घुले, विजय गव्हाळे, चेतन सपकाळ, सुरेश मेहतानी, संभाजी भिंगारदिवे, विपुल शेटिया, कलीम शेख, प्रवीण सपकाळ, मीना मेहतानी उपस्थित होते.
सुरूवातीलाच मुंडे यांनी जवळपास शंभर कार्यकर्त्यांची नावे वाचली. नंतर त्याचं कारण सांगितलं. संग्राम जगताप यांनी ते वाचण्याचा आग्रह धरला. कार्यकर्त्यावर त्यांचा किती जीव आहे यातून दिसते असा गौरव त्यांनी केला. फक्त आश्‍वासनं देणारे भाजप सरकार सत्तेतून पायउतार होऊन परिवर्तन होणार हे पक्क असून भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची घोषणाही मुंडे यांनी येथे केली.
संग्राम जगताप यांनी विकासाचे नारळ कोणीही फोडा पण विकास झाला पाहिजे. विकासाच्या आड कोणी आले तर त्याला तेथेच आडवे करा असे सांगत नारळ आम्ही पुरवू असंही स्पष्ट केलं. दादा कळमकर, माणिक विधाते यांनी भिंगार विकासापासून वंचित राहण्याला तत्कालीन लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचं सांगत आता विकास दिसेल असे सांगितले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिजीत खोसे, मुस्सा सय्यद, संजय खताडे, साहेबान जहागिरदार, दीपक लिपाने, अजिंक्य भिंगारदिवे, सिध्दार्थ आढाव, मतीन शेख, नूर शेख, श्रीकांत केदारे, लाला खान, मुसद्दीक मेमन, विनोद खैरे, रोहन शिरसाठ, अनिकेत चव्हाण, ऋषीकेश ताठे, दिपक खेडकर, अशिष भगत, सागर गुंजाळ, विशाल शिंदे, काझीम शेख, तनवीर मनियार, सनी ताठे, दिलदारसिंग बीर यांनी विशेष परिश्रम घेतले.

यांचा झाला प्रवेश
निलेश गोंधळे, प्रा. सीताराम काकडे, सागर चाबुकस्वार, दिनेश रणदिवे, गीताराम काळे, शेख मतीन, शहबाज जहागीरदार, इम्रान शेख, शाहनवाज शेख, अनिता दुराळे शेख, अरूणा बोरा, अंजना परदेशी, मीनाताई मोरे.

नवीन शाखा व त्याचे अध्यक्ष
गवळीवाडा (भिंगार)- अध्यक्ष- प्रवीण सपकाळ, उपाध्यक्ष संतोष नामदे, कार्याध्यक्ष किशोर शेलार, अक्षय नामदे.
नेहरू कॉलनी (भिंगार)- अध्यक्ष गौरव बोरकर, उपाध्यक्ष- अदित्य वाल्मिक, कार्याध्यक्ष मनिष टाक.
हातमपुरा शाखा- अध्यक्ष फरहान खान, उपाध्यक्ष- नवेद सय्यद, कार्याध्यक्ष मनोज पंगुडवाले.
बागरोजा हडको शाखा– अध्यक्ष राहुल कांबळे, उपाध्यक्ष ललीत गायकवाड, कार्याध्यक्ष दर्शन परदेशी.
बालिकाश्रम रोड शाखा (ताठे मळा)– अध्यक्ष अक्षय बारवकर, उपाध्यक्ष शुभम आव्हाड.

LEAVE A REPLY

*