नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात महागाईचा भस्मासूर : धनंजय मुंडे

0

अहमदनगर : भाजप सेना सरकारच्या काळात अच्छे दिन फक्त मंत्र्यांनाच आले आहेत. हे शकलबाद सरकार आहे. जनतेला भुलवण्यात पटाईत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात 375 रुपयाला गॅसची टाकी आता 800 रुपयाला विकली जाते. देशात महागाईचा भस्मासुर पसरला असताना यांना स्वच्छता व शौचालय या विषयावर चर्चा करण्यात रस आहे. मोदी काही दिवसांनी हुकूमशहा सारखी मंत्री नको मी एकटाच देश चालवायला भक्कम आहे. भविष्यकाळात नसबंदी करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. शिवसेनेने आता बोर्डावरून वाघ काढून शेळी नव्हे आता ससा लावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कुमारसिंह वाकळे यांच्या सावेडी येथील राष्ट्रवादीच्या आधार संपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. संग्राम जगताप, माजी आ. दादा कळमकर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते, संपत बारस्कर, स्वप्नील शिंदे, बबनराव वाकळे, सुरेश बनसोडे, प्रशांत धलपे, अजिंक्य बोरकर, योगेश साबळे, पोपट बारस्कर, दत्ता सप्रे, कातोरे आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले की, युवक काँग्रेसने राज्यभर 5 हजार शाखा काढण्याचा संकल्प केला. युवकांना संगटित करून चांगल्या मार्गाने गेऊन जाण्याचा जो प्रयत्न आहे तो कौतुकास्पद आहे. कुमारसिंह वाकळे तरुण नगरसेवकाचे काम पाहून मनाला आनद झाला. आ. संग्राम जगताप यांनी नगर शहरामध्ये तरुणांची चांगली पळी निर्माण केली आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाऊन काम करमारा आमदार म्हणून संग्राम जगताप यांच्या राज्यात नावलौकिक आहे, असे सांगितले.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत. सावेडी उपगराचे अनेक प्रश्न आम्ही सर्वांनी सोडविले आहेत. आधार संपर्क कार्यासलयाच्या माद्यमातून दिनदुबळ्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम करू. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून समाजातील प्रश्न सोडविण्याचे काम करू, असे सांगितले.
कळमकर म्हणाले की, शरद पवार यांचे विचार तळागाळातील घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम आम्ही केले आहे. ते 10 वर्षे केंद्रात कृषिमंत्री असताना शेतकरी, व्यापारी यांच्या हिताचे निर्णय घेतले. कृषी खाते जागतिक पातळीवर 2 नंबरला ठेवण्याचे काम पवार यांनी केले. आ. जगताप गेली 3 वर्षे नगर शहरात आमदारकीच्या माध्यमातून चांगले काम करीत आहेत. त्यांचे आम्ही कौतुक करतो. यावेळी आ. संग्राम जगताप व संग्राम कोते यांचे भाषण झाले.

LEAVE A REPLY

*