अहमदनगर : अमोल शिंदे यांना साहित्य काव्यगंध पुरस्कार

0
अहमदनगर (नगर टाइम्स डिजिटल) : औरंगाबादच्या साहित्य काव्यगंध यांच्या वतीने पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ‘साहित्य काव्यगंध’ पुरस्काराने कवी अमोल दशरथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कवी शिंदे यांना प्रा. डॉ. पृथ्वीराज तोर (नांदेड) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अमोल शिंदे यांनी वेगवेगळ्या विषयांवर कविता लेखन केले आहे. त्यांच्या या लिखाणाची दखल घेऊन साहित्य काव्यगंध कोअर कमिटी यांनी सर्वानुमते नव कवी अमोल शिंदे यांची पुरस्कारासाठी निवड केली.
कवी अमोल शिंदे यांना पुणे येथे शब्द विद्या साहित्य संमेलनात शब्दफुल पुरस्कार कवी अभिनेते उदयमानव अशोक ठोकळ यांच्या हस्ते व बार्शी येथील राज्यस्तरीय संमेलनात काव्य दौलत पुरस्कार प्रसिद्ध लेखक, गायक मदन दादा देगांवकर यांच्या हस्ते मिळाला आहे.
साहित्य काव्यगंध पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी अमोल शिंदे यांचे दशरथ शिंदे, मीराबाई शिंदे, कवी रोहिदास ढोले, कवी स्टीपन खावडिया, कवी रज्जाक शेख, विकास तरे, कवयित्री उज्ज्वला कोल्हे, कवयित्री गायत्री सोनगे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*