अहमदनगर : स्वाती शर्मा मिसेस महाराष्ट्र 2017 ‘गोल्डन हार्ट’ पुरस्काराने सन्मानित

0
अहमदनगर (नगर टाइम्स डिजिटल):  नगर येथील स्वाती प्रविण शर्मा यांना मिसेस महाराष्ट्र 2017 गोल्डन हर्ट पुरस्काराचा बहुमान मिळाला असून त्यांना सन्मानित करण्यात आले.
दिवा पॅजेंट्स व महाराष्ट्र वन वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिसेस महाराष्ट्र 2017 ची अंतीम फेरीत गोल्डन हार्ट व ग्रूमिंग सेशन मध्ये स्वाती शर्मा यांना बेस्ट ड्रेस अ‍ॅवार्ड असे पुरस्कार मिळाले.
महाराष्ट्रातील 20 स्पर्धकांमधून त्यांची निवड होऊन हा बहुमान त्यांनी पटकाविला त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उद्योगपती प्रविण शर्मा यांच्या त्या पत्नी असून नगरमधील माजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अर्जुन तांदळे यांच्या त्या सुकन्या आहेत.

LEAVE A REPLY

*