अहमदनगर : राज्य नाट्यची तिसरी घंटा; उद्यापासून स्पर्धेस सुरूवात

0
अहमदनगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणारी 57 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी उद्या दि. 7 ते 20 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. उद्या पासून दररोज सायंकाळी 8 वा. माऊली सभागृह येथे हि  प्राथमिक फेरी पार पडणार आहेत.
नाट्य क्षेत्रात राज्य नाट्य स्पर्धा ही अत्यंत मानाची समजली जाते. दरवर्षी राज्य सरकारच्या वतीने ही स्पर्धा भरवली जाते. उदयोन्मुख नाट्य कलावंत, हौशी कलाकार, या स्पर्धामुळे व्यासपीठ मिळत आहे.
सावेडी येथील माऊली सभागृह येथे उद्या मंगळवार दि. 7 रोजी सायंकाळी 8 वा. श्रीरामपूर येथील सार्थक बहुउद्देशीय संस्थाची याचक (लेखक प्रल्हद जाधव), या नाटकांना स्पर्धास सुरूवात होणार आहे. तर या स्पर्धाचा समारोप दि. 20 नोव्हेंबर रोजी जिल्हा हौशी नाट्य संघाच्या स्लाईस ऑफ द लाईफ या नाटकांने होणार आहे. तसेच दि. 8 नोव्हेंबर सप्तरंग थिएटर्स, अहमदनगर. अखेरीची रात्र (लेखक – लक्ष्मीकांत देशमुख),  दि. 9 नोव्हेंबर द स्प्लिट, (लेखक – प्रसादर बानसोडे) रंगोदय प्रतिष्ठान, अहमदनगर, दि.10 नोव्हेंबर प्रगत कला महाविद्यालय, तारकपूर अहमदनगर. हाटेल (लेखक – गणेश गाडेकर) दि.11 नोव्हेंबर  नवरंग नाट्य नाट्य प्रतिष्ठान, अहमदनगर. चाहूल (लेखक – प्रशांत दळवी), दि.12 नोव्हेंबर नगर तालुका ग्रामीण कला, क्रीडा अकादमी, देऊळगांव सिध्दी अहमदनगर. लास्ट स्टॉप (लेखक – बाळासाहेब चव्हाण), दि.13 नोव्हेंबर कर्णेज अ‍ॅकॅडमी, श्रीरामपूर, कुस बदलतांना (लेखक – भगवान ह्रिे), दि.14 नोव्हेंबर जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रिडा, ग्रामीण, शैक्षणिक मंडळ, अहमदनगर. अतृप्त (लेखक – विजय दळवी), दि.15 नोव्हेंबर होप फाऊंडेशन, अहमदनगर. लढा (लेखक – मनोज गोहेर). दि 16 नोव्हेंबर जिप्सी प्रतिष्ठान, अहमदनगर. आकाशपक्षी (लेखक – कुमार देशमुख),दि.17 नोव्हेंबर एकात्मता युवक मंच, अहमदनगर. एक्झिट (लेखक –  अरविंद लिमये), दि.18 नोव्हेंबर चौपाटी करांजा मित्र मंडळ, अहमदनगर. मर्डरवाले कुलकर्णी (लेखक – जयंत उपाध्ये), दि.19 नोव्हेंबर केरिंग फ्रेंडस्, अहमदनगर. बिग बॉस. (लेखक –  अमोल साळवे) दि. 20 नोव्हेंबर अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघ, अहमदनगर. स्लाईस ऑफ द लाईफ (लेखक –  सुनील हरिश्चंद्र).

LEAVE A REPLY

*