शास्तीमाफी देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही

0

अहमदनगर : शास्तीमाफी दिल्यानंतर अपेक्षित कर भरणा होत नाही. उलट पक्षी यापूर्वी शास्ती भरलेल्यांना ती परत द्यावी लागेल. त्यामुळे शास्तीमाफी देणार नाही असा निर्णय महापालिका आयुक्त घनशाम मंगळे यांनी गुरूवारी जाहीर केला.
त्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महापालिकेत आसूड मारून घेत आक्रोश आंदोलन करण्यात आले. शास्तीमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही असा पवित्रा घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांना निवेदन दिले.
आ. संग्राम जगताप यांनी शास्तीमाफीची मागणी केली होती. आयुक्तांनी प्रशासनाकडून अहवाल मागविल्यानंतर जगताप यांनी मागणी फेटाळून लावली. 238 कोटी रुपये महापालिकेला देणी लागतात. 2015 मध्ये शास्तीमाफीचा निर्णय घेतल्यानंतर निव्वळ 100 कोटी रुपयांचा कर वसुल होईल अशी अपेक्षा होती, मात्र केवळ 8 कोटी 18 लाख रुपये जमा झाले. त्यानंतर शास्तीमाफी देणेच महापालिकेने बंद केले. त्यानंतर सुमारे 8 कोटी 31 लाख रुपयांची शास्ती मालमत्ताधारकांनी भरली आहे. शास्तीमाफी दिली तर महापालिकेला भरलेली शास्ती परत द्यावी लागेल. या परिस्थितीत ते शक्य नाही. शास्तीमाफी दिली तर किती कर भरणा होईल यावर शंका उपस्थित करत आयुक्तांनी शास्तीमाफी न देण्याचा निर्णय जाहीर केला.
आयुक्तांच्या या निर्णयाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, अरिफ शेख, संपत बारस्कर, दीपक सुळ, प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, सारंग पंधाडे, संजय झिंजे, उबेद शेख यांनी महापालिकेत आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन सुरू केले. हानीफ जरीवाला, संजय झिंजे, उबेद शेख यांनी अंगावरील कपडे काढून स्वत:लाल आसून मारून घेतले. शास्तीमाफी घेतल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

आ. संग्राम जगताप पेटले इरेला
आयुक्तांनी शास्तीमाफीच्या मागणीचा आवमान केल्याने संतापलेल्या आ. संग्राम जगताप यांनी महापालिकेत ठिय्या आंदोलन सुरु केले. निरंतर नगरसेवा या ब्रिदवाक्यानुसार अत्यावश्यक सेवा बंद होणार नाहीत असे दोन ओळींचे लेखीपत्र द्या, यासाठी ते इरेला पेटले. त्याशिवाय येथून उठणार नाही अशा भूमिका घेत त्यांनी आंदोलनाची तिव्रता वाढविली. शास्तीमाफी दिल्यास कर गोळा होऊन हालाक्याची आर्थिक स्थिती सुधारेल असे त्यांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

*