रस्त्यावर पेटली चूल!

0

राष्ट्रवादी महिला आघाडीचे आंदोलन गॅस दरवाढीचा निषेध

अहमदनगर : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या वतीने दिल्लीगेट येथे रस्त्यावर चूल मांडून अनोखे आंदोलन केले. या वेळी सरकार विरोधात घोषणाही देण्यात आल्या.
युपीए सरकारच्या काळात गॅस टाकीचे दर पावणेचारशे रुपये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात हे दर सुमारे 800 रुपये झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. यूपीएच्या काळात सबसिडी सरकार भरत होते. परंतु या सरकारने सर्व पैसे घेत असल्यामुळे गॅसची टाकी घेणे सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसास गॅस टाकीवाचून अडचण निर्माण झाली आहे. महागाईमुळे मेटाकुटीला आलेला नागरिक आता गॅस दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. याच्या निषेधार्थ गॅसच्या टाकीला फुले वाहून श्रद्धांजली अर्पण केली व पारंपरिक चूल व स्टोव्ह वापरण्याची वेळ या सरकारमुळे आली आहे. एकीकडे हे सरकार आधुनिक व डिजिटलकडे जायचे म्हणतात. परंतु महागाईमुळे या वस्तु वापरणे सर्वसामान्याला परवडत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांनी केले.
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने महागाईच्या विरोधात दिल्लीगेट येथे गॅसच्या टाकीला हार घालून व गॅसवर चूल पेटवून निषेध करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे बोलत होत्या. यावेळी अ‍ॅड. शारदा लगड, राजश्री मांढरे, गंगूबाई गवळी, मनीषा आठरे, रेखा भोईटे, वनिता हांडे, सुनीता कांबळे, अरुणा बोरा, किरण कटारिया, गीता कामत आदींसह महिला उपस्थित होत्या.
दिल्लीगेट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला भाजप सेना सरकारचा निषेध करून चूल व स्टोव्ह पेटवला. सरकारच्या विरोधात महिलांनी घोषणा दिल्या. महागाईने हैराण झालेल्या नागरिकांकडे आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. 1 तारखेपासून गॅस टाकीमध्ये अजून दरवाढ झाली असून, याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. कच्च्या तेलाचे भाव कमी होऊनही या सरकारने भाव वाढ केली.

LEAVE A REPLY

*