अहमदनगर : साठेंचा वाटा 70 लाखांचा कोटा

‘विकास’साठी निधी काँक्रिटीकरणास सुरूवात

0

अहमदनगर :  देशभरात ‘विकास’ हरवल्याची चेष्टा सुरू असताना भाजपच्या नगरसेविका नंदा साठे यांना ‘विकाससासाठी’ 70 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. खासदार दिलीप गांधी यांनी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून आणलेल्या 10 कोटीच्या कोट्यातील साठे यांचा कोटा 70 लाख असल्याची माहिती माजी नगरसेवक मनेष साठे यांनीच जाहीरपणे दिली.
गत 25 वर्षापासून साठे कुटुंब राजकीय क्षेत्रात असून कधी पत्नी नंदा तर कधी मनेष साठे स्वत: नगरसेवक म्हणून महापालिका सभागृहात आहेत. आमदार, खासदार यांच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध पाहता साठे यांना वार्डातील विकास कामासाठी निधीची कधी कमी पडली नाही. प्रभागाचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची कायमच धारणा असते. नंदा साठे या आजमितीला 26 नंबर वार्डचे प्रतिनिधीत्व करतात. गत आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून अहमदनगर महापालिकेला दिला. खासदार दिलीप गांधी यांनी त्यासाठी पाठपुरावा केला. त्यातून 70 लाख रुपयांचा निधी साठे यांच्या वार्डातील विकास कामांवर खर्च केला जाणार आहे.
नगरसेविका नंदाताई े यांच्या प्रयत्नातून कानडे मळा येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ पारूबाई थोरवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मनेष साठे यांनी ही माहिती दिली. धुरपता गाडे, सदाशिव रासकर, लक्ष्मण काळे, सीताबाई हंबार्डे, मंगल आगरकर, संगीता जावळे, लाला भोगाडे, संगीता कानडे, मनोज सुंबे, प्रकाश काळे, अनिल रासकर, गणेश थोरवे, संजय शिरसाठ, कैलास जावळे, तात्या गायकवाड, राजेंद्र कानडे, विजय कानडे, ओंकार साठे यावेळी उपस्थित होते.

सलग 5 वेळा नगरसेवकपदाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी सर्व जाती धर्मातील नागरिकांनी दिली. नागरिकांच्या विश्वासाला पात्र राहून प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय आहे. निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करत आहे. विकास कामासाठी प्रभागातील नागरिकांशी संवाद आवश्यक असतो. हा संवाद साधल्याने कामे करताना त्याचा फायदा होतो. प्रत्येकाला नागरी सुविधा मिळवून देण्याकामी प्रयत्नशील आहे.
– मनेष साठे, माजी सभापती तथा नगरसेविका नंदा साठे यांचे पती.

 

LEAVE A REPLY

*