नगर रायझिंगच्या रनर्सचा औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग

0

अहमदनगर : येथील नगर रायझिंग ग्रुपने मराठवाडा भागातील ऐतिहासिक दौलताबाद किल्ला-वेरुळ लेणी मार्गावरील सर्वात मोठ्या एम.आय.टी. औरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन मध्ये यशस्वी सहभाग नोंदवला. नगर रायझिंग ग्रुपच्या 30 सदस्यांनी 10, 21 व 25 कि.मी. ची अल्ट्रा हाफ मॅरेथॉन पुर्ण केली. 10 कि.मी. मध्ये महेश मुळे चौथ्या स्थानावर राहिले.
या स्पर्धेत तीन हजार रनर्सनी सहभाग नोंदवला. यामध्ये राज्यासह देश, विदेशातील नामवंत धावपटू सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये नगर रायझिंगचे रनर्सनी 10 कि.मी. मध्ये संदिप जोशी, निलम पंडित, विद्या दाभाडे, योगेश गोडबोले, सुनिल देशमुख, गौतम जायभाय, श्याम तारडे, प्रसाद तनपुरे, रवी पठारे, ज्ञानेश कुलकर्णी, सागर वाघ, मृणाल वाघ, जमील शेख, आकाश भन्साळी, योगेश चुत्तर, गणेश पिंगळे, अमोल सायंबर, दादा घोडके, मारुती शेळके, अमृत पितळे, अमृत शेळके, डॉ.प्रदिप चोभे, अशोक बारगजे, अशोक धायगुडे, सिध्दांत कुमठ, 21 कि.मी. मध्ये योगेश खरपुडे, अंबादास हुलगे, चंद्रशेखर सावंत, 25 कि.मी. मध्ये विलास भोजणे यांनी अल्ट्रा हाफ मॅरेथॉन पुर्ण केली.

LEAVE A REPLY

*