अहमदनगर : मनसैनिकांवर गुन्हा

0

अहमदनगर : न्यायलयाच्या आदेशानुसार कल्याण रोडवरील पडलेल्या धार्मिक स्थळाची भिंत बांधल्या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहर सचिव नितीन भुतारे, शहरध्यक्ष गिरीष जाधव यांच्या विरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात, न्यायलयाच अवमान, महानगरपालिका अधिनियमाचे उल्लंघन व रस्त्यावर अतिक्रमण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभागअधिकारी अंबादास सोनवणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळं न्यायलयाच्या आदेशनुसार महापालिकेकडून पाडण्यात येत आहे.

कल्याण रोडवरील लक्ष्मीमात मंदिरा या कारवाई पाडण्यात आले होते. 23 नोव्हेंंबर रोजी मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सिमेंट व विट्याच्या सहाय्याने पाडलेल्या मंदिराची भिंत बांधल्याचे आढळून आले आहे. न्यायलयाच्या आदेशाचा भंग करून सार्वजनिक रस्त्यामध्ये बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*