एमआयडीसीमधील अंतर्गत रस्त्यावर सुरक्षा उपाय न केल्यास काँग्रेसचे आंदोलन

0

अहमदनगर : एमआयडीसी मधील अंतर्गत रस्त्यावर व संभाजी नगर येथील अपघात प्रवण क्षेत्रात रस्ता सुरक्षा उपाय योजना ना केल्यास शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सत्यजीत दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यांत येईल असे निवेदन शहर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस मयूर पाटोळे व कार्यकर्त्यांनी एमआयडीसी चे कार्यकारी अभियंता श्री वाघ याना दिले
निवेदनात म्हटले आहे कि सर्वच रस्त्यावर अपघात प्रवण क्षेत्र तयार झाले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तसेच रस्त्यापासून जवळच शाळा असून विद्यार्थ्यांच्या जीवास धोका आहे त्यामुळे उपरोक्त ठिकाणी रस्ता सुरक्षा उपाय योजना कराव्यात त्याठिकाणी गतिरोधक , झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या , साईड पट्ट्या आदी उपाय करावेत जेणेकरून जीवित व वित्त हानी होणार नाही
हे निवेदन दिल्यावर संध्यकाळी एमआयडीसीतील एल आय सी कॉलनी जवळ अपघात झाला यामधील दोन्ही बाईक स्वरांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल मध्ये नेले यातील एका जखमीला नगरच्या सिटी केयर हॉस्पिटल मध्ये आय सी यू मध्ये ठेवण्यात आले असून त्याच्या मेंदूला सूज असून चेहर्‍याच्या भुवई , गाल व जबडा या तीन ठिकाणी ऑपरेशन करून हाडे दुरुस्त करावे लागणार आहे , आज मयूर पाटोळे यांनी त्याची भेट घेतली
तसे रोजच किरकोळ अपघात या ठिकाणी होतात आठ दिवसात हे काम झाले नाही तर आंदोलन करण्यात येणार आहे असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे

 

LEAVE A REPLY

*