अहमदनगर : ओ बाबा.. रोडवर कचरा टाकायचा नाय…! महापौरांचे आर्जव

व्यावसायिकांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ

0

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा देत स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. अहमदनगर महापालिकाही त्यात मागे नाही. मात्र मोहीम राबवूनही उपयोग होत नाही. त्यामुळे महापौर सुरेखा कदम यांनी व्यावसायिकांना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छतेचे महत्व पटवून सांगण्यासोबतच त्यांनी रस्त्यावर कचरा टाकू नका अशी अर्जव केली.

महापालिकेच्यावतीने विशेष स्वच्छता मोहिम अभियानांतर्गत माळीवाडा येथील विशाल गणपती मंदिर परिसरातील विक्रेत्यांना स्वच्छता व कचरा संकलनाची माहिती देवून, स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. महापौर सुरेखा कदम, स्वच्छता दूत डॉ. सुधा कांकरीया, शिवसेना महिला संपर्क प्रमुख रिता वाघ, संध्या सावंत, सुरेश खामकर, सुषमा पडोळे, आशा निंबाळकर, उषा ओझा, अरुणा गोयल, निर्मला धुपधरे, संगीता ससे, महापालिकेचे एस.एस. पैठणकर, अंबादास सोनवणे, किशोर देशमुख यावेळी उपस्थित होते. मंदिर परिसरात वर्का स्कुल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी जनजागृतीवर पथनाट्य सादर केले.

 

LEAVE A REPLY

*