अहमदनगर : चितळे रस्त्यावर पंटरांचा बाजार

पोलिसांचा छापा  मुंबई जुगार अड्डा उघड

0

अहमदनगर : नगर शहराच्या मध्यवस्तीतील चितळे रस्त्यावर पंटरांचा बाजार भरत होता. दिवसभरातील गल्ला पंटर बुकीला देत असत. हा मुंबई मटका बाजार पोलिसांनी छापा टाकून बंद केला. या छाप्यात सात पंटरांना पकडून त्यांच्याकडून 19 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. बुकी मात्र पसार झाले आहेत.

नगर शहरात दोन नंबरचे धंदे आजही सुरू असल्यावर या छाप्याने शिक्कामोर्तब केले आहे. चितळे रस्त्यावरील नगर वाचनालयाच्या परिसरात असणार्‍या मुंजोबा मंदिराच्या मागे बंद खोली हा अड्डा सुरू होता. पोलिसांना टीप मिळाल्यानंतर काल (गुरूवारी) रात्री 8 वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला. या छाप्यात रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 19 हजार 121 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सात पटरांविरूध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत दत्तात्रय अरकल यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

  • कचरे सर, पाठक पळाले…
    चितळे रस्त्यावरील कचरे सर आणि गिरीष पाठक हे मुंबई मटक्याचे बुकी आहेत. पाठक यांच्याच घरात बुकी पंटरांचा बाजार भरवित होता. दिवसभरातील कलेक्शन पंटर तेथे जमा करत. पंटरानेच ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर पाठक, कचरे सर हे दोघे बुकी पसार झाले.
  • हे आहेत जुगारी
    ईश्वर कैलास कुलथे (वय 32 रा. वाघ गल्ली नालेगांव), चेलाराम उद्धवदास काटारिया (वय 58 रा.टांगेगल्ली नालेगाव), विश्वंबर पांडुरंग बंडे (वय 54.रा. गणपती मंदिर पटवर्धन चौक), रतन किसन साखला (वय 45 रा. दातरंगे मळा), शिरीष लक्ष्मण वाघमारे (वय 58 रा पानसरे गल्ली), गिरीष पाठक (बुकी व घरमालक, फरार), महेश कचरे उर्फ कचरे सर (फरार) अशी आरोपींची नावे आहे.

LEAVE A REPLY

*