अहमदनगर : सातपुते, आधी दिवसा आपला तोल सांभाळा; प्रा. माणिक विधाते यांचा पलटवार

0

अहमदनगर : आपल्या माजी लोकाप्रतिनिधींनी 25 वर्षात काय उद्योग केले. कसे नगरचे वाटोळे झाले. त्यामुळेच तर नगरकरांनी त्यांना घरी बसवीले, राहिला विषय सारसनगरचा जर माहिती घेऊन थाप मारावी. महापालिकेच्या टँकर निवेदेमध्ये तर आपण स्लिपींग पाटर्नरच आहात.

हे नगरकरांना जाणून आहेत. त्यामुळे फेज टू योजना लवकरात लवकर कशी कार्यन्वीत होईल. अशी स्वाभावीक आपली मनस्वी इच्छा असेल. यामुळे आपण आरोप केल्यावर खरच आपल्या बुध्दीची मला किव येते. त्यामुळे सातपुते साहेब आपण तोल संभाळून आरोप करावे, आणि हो माझा तोल सुटतच असेल तर तो माझ्या वया प्रमाणे आपला तोल तर दररोज दिवसा ढवळ्या सुटलेला असतो. अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.

प्रा.विधाते यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकांत म्हटले आहे की, सातपुते साहेब आमच्यावर आरोप करण्याआधी आपला तोल संभाळा कारण बहुतेक वेळी सारे पत्रक आपण टेबावरच बसून तयार करतात. ही आपली सवय नगरकरांना चांगली माहित आहे. आणि मला जे पद भेटले ते माझ्या गुणवत्ता व सामाजिक कार्याची दखल घेऊनच पक्ष नेतृत्वाने ते बहाल केले. तुमच्या सारख्या शिव्या, शाप खाऊन किंवा लाचारी पत्कारून नव्हे, अहो, सातपुते साहेब राज्यात आपली सत्ता आहे.

दिड वर्षात साधा दिड रूपया नवीन पैसा आपल्याला आणता आला नाही. आणि वर तोंड करून सांगता महापौराच्या प्रभागात दिड कोटी रूपयांचे काम चालू आहेत. अहो आपल्या नेतृत्वाकडून आणि हे आपल्याला माहितच असेल कारण आपण तर स्लिपिंग पाटर्नरच आहात. असे तर आपले प्रताप आहे. आणि आपण म्हटलयाप्रमाणे माझा बोलविता धनी आमचे नेतृत्व आमच्या कामात हस्तक्षेप करत नाही. आमच्या नेत्याचे राजकारण सात वर्षाचे आहे.

सात वर्षात दोनदा महापौर, आमदार आणि पदाच्या माध्यमातून महापौरांचे काय काम असतात. आमदारांचे काय कामे असतात. या पदाच्या माध्यमातून काय करू शकतात. हे लोकांना समाजले आहे.

LEAVE A REPLY

*