अहमदनगर : बार असोसिएशन तर्फे ‘लॉयर्स डे’ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
अहमदनगर : अहमदनगर बार असेसिएशनतर्फे प्रथम राष्ट्रपती कायदे पंडीत व घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जन्मदिवस निमित्त उद्या रविवार दि.3 डिसेंबर रोजी लॉयर्स डे या कार्यक्रमास सकाळी 9 वा.सुरूवात होणार आहे.
यावेळी कार्यक्राचे अध्यक्ष म्हणून प्रधान जिल्हा न्यायाधिश प्रकाश माळी, जिल्हा न्यायाधिकश एच.एच.देशपांडे, तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी आर.एम.कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. असल्याची माहिती बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठोकळ यांनी दिली.
लॉयर्स डे निमित्त बाईक रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. या कार्यक्रमानंतर नोटीस बोर्डाचे अनावरण तसेच बारच्या माजी अध्यक्षांच्या सत्कार समांरभ करण्यात येणार आहे.
सोमवार दि.4 रोजी दुपारी 2 वा. फिटनेस हेल्थ या संस्थेमार्फेत आरोग्य विषयक जनजागृती व मोफत अद्यायावत मशिनव्दारे तपासी या शिबिराचे उद्घटान प्रधान दिवाणी न्यायाधिश एन.एल.काळे यांच्या हस्ते होणार आहे. सायकांळी 5 वा. भारतीय पुरवा कायदा व त्यातील महत्वाच्या तरतुदी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मंगळवार दि.5 रोजी सायंकाळी 5 वा. सायबर क्राईम या विषयावर प्रा.अ‍ॅड.एस.जी.फुंदे यांचे व्याख्यान होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधिश अशोक कुमार भिलारे तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही.बी.घाडगे यांच्या उपस्थितीत राहणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमास वकील बंधू भगिणींनी उपस्थित राहवे असे आवाहन अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठोकळ तसेच बारचे इतर पदाधिकारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*