ओबीसींच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादीचा लढा : ईश्‍वर बाळबुधे

ओबीसी जागृती रथयात्रा | नगरमध्ये नियोजन बैठक

0

अहमदनगर : राज्यात व केंद्रात सत्ता असताना आमचे नेते शरद पवार व अजित पवार यांनी ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून दिले. सध्याचे सरकार ओबीसींकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र ओबीसींना त्यांचे हक्क मिळवण्यासाठा राष्ट्रवादी कॉग्रेस प्रसंगी रस्त्यावर उतरेल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रसेच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष इश्‍वर बाळबुधे यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलतर्फे राज्यस्तरीय जनजागृती अभियान रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची नियोजन बैठक अहमदनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात झाली. या बैठकीत बाळबुधे बोलत होते. या बैठकीला निरीक्षक अ‍ॅड. सचिन औटी,महासचिव दत्तात्रय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, युवकचे प्रदेश सरचिटणीस व माजी सभागृहनेते कुमारसिंह वाकळे,ओबीसी शहर जिल्हाध्याक्ष अमित खामकर, विध्यार्थी अध्यक्ष वैभव ढाकणे, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, तुषार टाक, अरुण खिची, अनिकेत येमुल, लंकेश चितळकर, सर्वेश सपकाळ, अक्षय उमाप, स्वप्निल खरात यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बाळबुधे म्हणाले, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या प्रलंबित आहेत. सरकार फक्त घोषणा करते, मात्र अंमलबजावणी करीत नाही. येत्या काळात मागासवर्गीय सेलतर्फे जनजागृती अभियान यात्रा काढण्यात येणार आहे. ओबीसींना सर्वच स्तरावर संधी देण्यासाठी प्रयत्न आहेत. ओबीसींच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नत्तीसाठी राष्ट्वादीची भूमिका संघर्षाची आहे. आगामी निवडणुकांमध्ये ओबिसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर रथयात्रेद्वारे जागृती सुरू आहे.
शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर म्हणाले, ओबिसी समाजासाठी आतापर्यंत पक्षाचे नेते मा. शरद पवार साहेब व अजित पवार साहेब यांनीच न्याय मिळवुन दिला आहे. रथयात्रेत समाजाने सहभागी होवुन हक्कांसाठी सरकारशी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी

LEAVE A REPLY

*