धक्कादायक : नगरमध्ये होम बेस्ड सेक्स सर्व्हिस; एडस् रूग्णांचे प्रमाणही वाढले!

अबब! 4500 एड्सबाधीत

0

अहमदनगर : घरपोहच किराणा, घरपोहच हॉटेलचे जेवण, घरपोहच दूध हे व्यवहार आतापर्यंत आपण ऐकले असेलच; पण आता यात होम बेस्ड् सेक्स सर्व्हिस या नव्या ‘उद्योगा’ची भर पडली आहे. जिल्हा रुग्णालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नव्या ‘उद्योगा’चा उलगडा केला आहे. नगर शहरात साडेचारशे सेक्स वर्कर असून त्यातील दीडशे होमबेस्ड सेवा देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. नगर जिल्ह्यात साडेचार हजार एड्सबाधित रुग्ण असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

नगर शहरात 450 महिलांची सेक्स वर्कर म्हणून नोंद आहे. त्यांची होमबेस सर्व्हिसचे प्रमाण वाढले असून त्यावर पत्रकार परिषदेत चिंता व्यक्त करण्यात आली. सुमारे दीडशे महिला ‘होमबेस सर्व्हिस’ देत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सेक्स वर्कर आपल्या घराबाहेर पडून हा व्यावसाय करतात. मैत्रीण किंवा थेट ‘त्याच्या’ घरी अथवा त्रयस्थ ठिकाणी जाणे असा ‘होमबेस्ड्’ या शब्दाचा अर्थ होतो, असे स्पष्टीकरण जिल्हा रुग्णालयाच्यावतीने देण्यात आले.

1 ते 7 डिसेंबर दरम्यान नगर शहर आणि जिल्ह्यात एड्स निर्मूलन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध उपक्रम राबवण्यात येणार असून जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. पांडूरंग बोरूटे यांनी त्याची माहिती दिली. नगर जिल्ह्यात चआयव्ही संसर्गाचे प्रमाण गेल्या काही वर्षात कमी झाले आहे. 2002 मध्ये नगर शहर आणि जिल्ह्यात 31 टक्के एचआयव्ही बाधीत होते. 2017 ही टक्केवारी 2.6 पर्यंत घसरली आहे. ‘माझे आरोग्य, माझा हक्क’ या ब्रीदानुसार हा सप्ताह साजरा केला जाणार आहे.

नगर, राहाता, श्रीरामपुर, कोपरगाव, संगमनेर या तालुक्यात एचआचव्ही बाधीतांची संख्या वाढते आहे. हे तालुके एड्सच्यासाठी रेड झोनमध्ये आहेत. नव्याने एचआयव्ही बाधीतांमध्ये अशिक्षित, शेत मजूर, विविध क्षेत्रातील कामगार, एमआयडीसी कामगारांची संख्या अधिक आहे. सुशिक्षित आणि कॉलेज तरूण, तरूणीमध्ये हे प्रमाण घटले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एड्सने अडीच हजार जणांचा मृत्यू
नगर जिल्ह्यात 2002 पासून 2017 पर्यंत 18 हजार 599 रुग्णांना एचआयव्हीची लागण झालेली आहे. यातूल 2007 पासूनच्या आकडेवारीनूसार 2 हजार 249 रुग्णांची मृत्यू झालेला आहे. मात्र, ही आकडेवारी नोंदणीकृत रुग्णाची आहे. ज्यांची नोंदणी झालेली नाही. त्याचे पुढे काय झाले हे सांगण्यात येत नसल्याचे सांगण्यात आले.

रोज नव्याने होते लागण
जिल्हाभरातील रुग्णांची एचआयव्ही तपासणी केली जाते. दरमहा सुमारे 9 हजार रुग्णांची तपासणी केली जाते. त्यातील 60 रुग्णांना एड्सची लागण झाल्याचे समोर येत असल्याचे धक्कादायक आकडेवारी यावेळी जाहीर करण्यात आली.

मुंबई, पुण्याचा महिला नगरात :
नगर शहरात हा व्यवसाय करणार्‍या 450 नोंदणीकृत महिला आहेत. मात्र, मुंबई, पुणे, नाशिक या जिल्ह्यातून अनेक महिला नगरमध्ये येतात. नगर शहरातील ठराविक ठिकाणी त्या आपला ‘उद्योग’ करतात. फोन कॉलवर त्यांना येथे बोलविले जाते. त्याची नोंद कोठेच होत नाही. शहरातील उच्चभ्रू वर्गात हा प्रकार सर्रास सुरू आहे. मुंबई, पुण्याचा माल नगरात येतो अन् ‘बिझनेस’ करून जातो हे सगळ्यांना ज्ञात आहे. मात्र ‘हाय प्रोफाईल’ची बात असल्याने तो उघड होत नाही. शिवाय त्यावर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही.

LEAVE A REPLY

*