अहमदनगर : 1 जानेवारी पासुन कटींग व दाढी महागणार

कटींग 80 व दाढी 50 रूपये; अहमदनगर शहर सलून असो.च्या बैठकीत दरवाढीचा निर्णय

0
अहमदनगर : 1 जानेवारी 2017 पासून शहर सलून असो.च्या बैठकीत कटींग 80 व दाढी 50 दरवाढ करण्यात येणार आहे. नुकतीच अहमदनगर शहर असो.च्या बैठकीत ठरव करून दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. या दरवाढी मुळे सामान्य नागरिकांच्या खिश्याला फटका बसणार आहे.
अहमदनगर शहर सलून असो.चे अध्यक्ष जीवन सोत्रिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याबैठकी मध्ये बबनराव मदने, दिपक बिडवे, सुनिल निकम, विशाल सैंदाने यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन करतांना आपआपले मत मांडले. तसेच सदर दरवाढ ही 3 वर्षानंतर होत असल्याने व सौंदर्य प्रसादनाच्या वाढत्या किमंती विचारात घेता दरवाढीचा निर्णय करण्याचे ठरविले, तसेच आपल्या कामाच्या पद्धती कशी असावी, काम कसे करावे, ग्राहकांना आपन सुविधा कशाप्रकारे देऊ शकतो. ह्या गोष्टींचे मार्गदर्शन करुन सर्व सभासदांनी दर घेऊन आपला व आपल्या संघटनेचा विकास करावा असे मत मांडले.
1 जानेवारी पासून कटींग 80 व दाढी 50 करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच संघटनेच्या माध्यमातुन नवनवीन उपक्रम (व्यक्तीमत्व विकास, हेअरकट, स्किन ट्रिटमेंट) चे सेमिमार घेऊ असे जीवन सोन्नीस यांनी सांगितले.
सदर बैठकीस अविनाश रावताळे, सुनिल खंडागळे, जनार्दन वाघ, शहाजी कदम, माऊली गायकवाड, अशोक औटी, विशाल मदने, शाम विश्वास, आशिष ताकपिरे, वैभव सैंदाणे, राजेंद्र ताकपिरे, प्रकाश सोनवणे, अशोक खामकर, विलास आहेर, सोमनाथ कदम, बंटी शिंदे, सुनिल शिंदे, शेख निसार मन्सुर, संतोष साळुंके आदींसह सलून व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*