अहमदनगर : सिटी क्लब स्पोर्टस् फाऊंडेशन : आमदार चषक फूटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

0

अहमदनगर : सिटी क्लब स्पोर्टस फाऊंडेशनच्यावतीने न्यु आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, उद्योजक लॉरेन्स स्वामी, महेश सारसर, प्रा.सुधाकर सुंबे, स्पर्धेचे आयोजक तथा शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल पाटोळे, सचिन ठोसर, गणेश गायकवाड, तुकाराम गायकवाड, कचकल सर, प्रशांत पगारे, शुभम भिंगारदिवे आदिंसह खेळाडू उपस्थित होते.
प्रास्ताविकात राहुल पाटोळे यांनी फुटबॉल खेळाला चालना देवून, खेळाडूंना व्यासपिठ निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. खेळाला चालना देवून, खेळाडूंसाठी व्यासपिठ निर्माण करुन देण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे. खेळात सक्रीय झालेला युवक व्यसनापासून लांब राहतो. तसेच खेळाच्या माध्यमातून अनेक करिअरच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. आंतराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल खेळात नगरचे खेळाडू नक्कीच चमकणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली.
या फुटबॉल स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून, ही स्पर्धा सेव्हन ए साईट या पध्दतीने खेळवली जात आहे. एकदा हारलेला संघ स्पर्धेतून बाद होणार असून, पहिल्या दिवसापासूनच फुटबॉलचे सामने पहाण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना रविवार दि.03 डिसेंबर रोजी रंगणार आहे. प्रथम विजेत्या संघास 11 हजार रु., चषक व उपविजयी संघास 7 हजार रु., स्मृती चिन्ह देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*