अहमदनगर : जेलच्या वारीची हौस भारी

कोपर्डीच्या गुन्हेगारासाठी कांबळेची तोतयागिरी , फुकटच्या उपचारासाठी ‘आयडियाची कल्पना’

0

अहमदनगर :  दोन्ही किडण्या फेल… दवाखाना खर्चासाठी पैशाची पंचायत… अशातच पोलिसांनी पकडले तर फुकटात उपचार होतील ही ‘आयडीया’ सुचली… तशा पध्दतीनेच तो तोतयागिरी करू लागला. आजपर्यंत पोलिसांनी सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च त्याच्या किडणीवर केलाय… पण त्याची ही ‘आयडीया’ पोलिसांची किती डोकेदुखी ठरली या विचारापासून तो कोसो मैल दूर आहे. कोपर्डी खटल्यातील आरोपींच्या स्थलांतरासाठी त्याने तोतयागिरी केली खरी पण नगर पोलिसांनी त्याच्या ‘कर्तबगारी’चे बिंग फोडले. त्यानंतर ही सगळी ‘धडपड’ समोर आली. हे ऐकूण नगरचे पोलीसही थक्क झाले!

अमित जगन्नाथ कांबळे (वय 21, रा.निंबाळकर वाडा, नवीपेठ, पुणे) असे नगर पोलिसांनी पकडलेल्या महाठगाचे नाव आहे. त्याचे आई-वडील दोघेही मयत असून तो पुण्यात शाम कोंडेकर नावाच्या मामाकडे राहतो. त्याच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये त्याला उपचारासाठी वारंवार जावे लागत. त्यासाठी पैसे त्याच्याकडे पैसेच नाहीत. आपल्याविरुध्द पोलीस केस दाखल झाली तर पोलीस पकडून नेतील, जेलमध्ये टाकतील. जेलमध्ये गेल्यानंतर फुकटात उपचार होतील अशी ‘आयडीया’ त्याला सुचली.

010 पासून तो मग हेच उद्योग करू लागला. आजपर्यंत तो 5 ते 6 वेळा येरवडा जेलमध्ये गेला असून जेलमार्फत त्याच्या किडनी उपचारावर सुमारे 25 लाख रुपये खर्च जेलमार्फत झाला आहे. फुकटात खर्चासाठी तो हे ‘उद्योग’ करत असल्याचे समोर आले आहे. मात्र त्याचे हे ‘उद्योग’ पोलिसांनी किती महागात पडतात याची जाण मात्र त्याला नाही.
कोपर्डी खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्याच्या दिवशीच ‘मी मुख्यमंत्र्यांचा पीए विनय श्रीकांत कुलकर्णी बोलतोय’ असा तोतया फोन केला. त्यानंतर एसपी नावानेही तोतयागिरी केली. जेलरच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. एसपी रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या टीमने रविवारी या तोतयाला पुण्यातून पकडले. त्यानंतर त्याची तोतयागिरी समोर आलीच पण त्यामागचा उद्देश ऐकून नगरचे पोलीसही थक्क झाले. त्याला खरंच किडनीचा आजार आहे का? याची खातरजमा पोलीस करणार आहेत. प्रथमदर्शनी तो मनोरुग्ण असल्याचे दिसते असे पोलिसांनी सांगितले.

नोकरीच्या अमिषाने कमविले पैसे
जस्ट डायलवरून त्याने प्लेसमेंट ब्युरोचे नंबर घेतले. नंतर त्या ब्युरोचे नाव सांगून त्याने बेरोजगार तरुणांचे नाव, पत्ते घेतले. नंतर त्यातील आठ-दहा बेरोजगारांशी डॉ. विनय श्रीकांत कुलकर्णी नावाने फोन करत संपर्क साधला. त्यातील तिघांनी नोकरीसाठी संपर्क केला. बँक खाते उघडण्यासाठी त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये मागितले. रिना शेख, झिनत शेख यांनी साडेतीन हजार रुपये पाठविले. त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातूनच तो हे उद्योग करत

  • जस्ट डायलचा वापर
    व्हीव्हीआयपीचे फोननंबर मिळविण्यासाठी तो जस्ट डायल अ‍ॅपचा वापर करत होता. तेथे तो खोटेनाटे सांगून व्हीव्हीआयपीचा नंबर मिळवत. त्यानंतर तो हे असले ‘उद्योग’ करत.
  • सीमसाठी सुनिताची कागदपत्रे
    सुनीता सागर बारवकर, अक्षय सुरेश जगताप (दोघेही रा. पुणे जिल्हा) आणि सारीका दत्तात्रय काळे (रा. सोलापूर) यांनी प्रत्येकी 1 हजार 600 रुपये व कागदपत्रे कुरीअरने कांबळे याने दिलेल्या पुण्याच्या पत्त्यावर पाठविले. त्यातील सुनीता बारवकर यांच्या कागदपत्रांचा वापर करून कांबळे याने सीमकार्ड घेतले. त्याच सीमचा ापर त्याने कोपर्डीतील गुन्हेगारांच्या तोतयागिरीसाठी केला.
  • पुण्याच्या सीपीलाही दिल्या शिव्या
    कांबळे याने 2010 मध्ये पहिल्यांदा पुण्याचे तत्कालीन सीपी सत्यपाल सिंह यांना फोनवरून शिवीगाळ केली होती. त्यासाठी त्याने माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या जागेचा वापर केला होता. हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी त्याला पकडले होते.

LEAVE A REPLY

*