अहमदनगर : लव्ह, लोच्या, ब्रेकअप…

सासर्‍याच्या आँखोदेखीने अफेअरचे बिंग फुटले, पोलिसात तक्रार

0

अहमदनगर  लग्न होऊन वर्ष उलटत नाही तोच तिचं सासरी नवं अफेअर सुरू झालं. नवर्‍याच्या खास मित्रानेच तिला पटवलं. अफेअर रंगात आलं असताना सासर्‍यानं ‘लैला-मजनूला’ ‘कॅच’ केलं. अन् तिथंच ‘ब्रेकअप’ची घंटा वाजली. इतकं सगळं घडूनही तिने नवर्‍याविरोधातच पोलिसांत तक्रार करत थेट माहेर गाठलं. हे कोण्या चित्रपटातील कथानक नाही, ही आहे नगरजवळील एका गावातील प्रेमाची ही वास्तववादी गोष्ट…

नगर तालुक्यातील एका गावातील चहा विक्रीचा व्यवसाय करणार्‍या तरुणाचे वर्षभरापूर्वीच पारनेरातील मुलीशी विवाह झाला. ज्या तरुणाशी तिचा विवाह झाला त्याच्या खास मित्र तोही शेजारीच राहणारा. तो मित्रही तरणाबांड अन् बिगर लग्नाचा. त्याच्या नजरेत ती भरली अन् तो दोस्ती विसरला. लग्नानंतर ती सासरी आली. नवर्‍याच्या प्रेमात पडण्याऐवजी ती शेजारच्या (नवर्‍याच्या मित्राच्या) प्रेमात पडली. त्याने दोस्तीत कुस्ती करत मित्राला चितपट केलं. त्याचं प्रेम थेट चोरीछुपके भेटीपर्यंत पोहचलं. घराशेजारीच रहायला म्हटल्यावर तो थेट तिच्या बेडपर्यंत पोहचला.
अनेक दिवस हे असं सुरू होतं. 30 नोव्हेंबरच्या पहाटेच्यावेळी तो तिच्या बेडवर होता. सासरे उठल्याने त्याच्या नजरेत हा प्रकार आला. दोघांना ‘कॅच’ केल्यानंतर ते हिरमुसले. मग तिनेच विषारी औषध सेवन करून सासरे, सासू, नवरा अन् प्रियकरलाही गोत्यात आणलं. सासूने हात धरून दिराने तोंडात विषारी औषध टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार तिने थेट पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कोण्या एका चित्रपटातील नाहीतर देहर्‍यात घडलेली सत्य घटना आहे.

  • प्रियकराला मिळाला धडा
    वीस वर्षाची तरुणी तेही गळ्यात ‘लायसन’ असलेली मिळाली म्हटल्यावर हा तरुण तिच्या प्रेमात चुटकशी पडला. भांडाफोड झाल्यावर तिने त्यालाही सोडलं नाही. त्याच्याही विरोधात पोलिसांत तक्रार दिली. इकडं सख्ख्या मित्रानेही त्याला सोडले नाही. त्यानेही विवाहित स्त्रीसोबत संबंध ठेवल्याच्या कलमान्वये पोलिसांत तक्रार दिली. प्रियकराला दोन्ही बाजूने पोलिस केसेसला सामोरे जावं लागलं. त्यातून त्याला चांगलीच अद्दल घडली.
  • घटस्फोटाच्या दारात..
    नवीनच लग्न झालं आहे. तक्रारी करू नका. समझोता करून घ्या. खोटी तक्रार करून काही होणार नाही असं एमआयडीसीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण तिला अन् तिच्या भावाला समजावत होते. मात्र ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्हाला आता घटस्फोट घ्यायचा आहे, आमची तक्रार घ्या असा हट्ट तिने लावून धरला. कायद्याने तक्रार घेणे मग पोलिसांना टाळता येईना. अखेर पोलिसांनी माणुसकी धर्म बाजुला ठेवत गुन्हा नोंदविला.
  • गत आठवड्यात प्रियेसीवर गोळीबार करून स्वत:च आत्महत्या केल्याची घटना एका गावात घडली होती. त्यानंतर आज पुन्हा प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला. गावात असं कसं काय सुरू आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे. नगर शहराजवळ सायंकाळच्या वेळी ‘डेरा’ पडलेला असतो. मनमाड महामार्गालगत अनेक ठिकाणं निर्जन आहेत. तेथेच प्रेमिकांचा ‘डेरा’ दिसून येतो.

LEAVE A REPLY

*