अहमदनगर : यात्रा बंदोबस्ताला गेले अन् दरोडेखोर पकडून आले

एलसीबीची कामगिरी देवाच्या दारात पाठलाग

0

अहमदनगर : दत्त जयंतीनिमित्त नेवासा तालुक्यातील देवगड येथे बंदोस्तासाठी असलेल्या एलसीबी पोलिसांनी पाच दरोडेखोरांना जेरबंद केले. त्यांच्याकडून रोख रक्कम, दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कृष्णा भानुदास साठे (रा. ओझर, गंगापूर, औरंगाबाद), रोहित विलास सौदागर (वार्ड न.2, श्रीरामपूर), सागर सुरेश कांबळे (रामनगर, श्रीरामपूर), बजरंग रघुनाथ पवार (माणिकदौंडी, पाथर्डी) आणि अशोक नवनाथ पवार (नाथनगर, पाथर्डी) असे पकडलेल्या पाच दरोडेखोरांची नावे आहेत.

देवगड परिसरात दत्त जयंती निमित्त बंदोबस्तासाठी असलेले एलसीबीचे एपीआय शदर गोर्डे यांना बातमीदारा मुरमे ते मडकी रस्त्याकडेला दरोडेखोर दबा धरून बसल्याचे समजले. ते तत्काळ फौजफाट्यासह तिकडे पोहचले. त्यावेळी रस्त्यावर तीन मोटार सायकलवर तिघे बसल्याचे त्यांना दिसले. पोलीस दिसताच त्यांनी पळण्यास सुरूवात केली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दबा धरून बसलेले आणखी पाच जण पळत असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. नेवासा पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवाशाचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, शरद गोर्डे, पोसई सुधीर पाटील, पोहेकॉ सुनिल चव्हाण, योगेश गोसावी, संभाजी कोतकर, पोना, संदीप पवार, राहुल हुसळे, जयवंत तोडमल, विशाल गवांदे, सचिन अडबल, अशोक गुंजाळ, सुरज वाबळे, गणेश मैड. किरण जाधव, बबन बेरड, संदीप आजबे या पोलिसांनी ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

*