बुरखाधारी महिलांनी लावला चुना; सराफी दुकानातून सोने लंपास

0

अहमदनगर : खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी सराफी दुकानातून सोने लंपास केले. त्या महिला गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलिसांनी अज्ञात महिलांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील गंजबाजार येथील मिरांडे सराफ दुकानात गुरूवारी सायंकाळी ही चोरी झाली. राजेश किसन मिरांडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. राजेश मिरांडे यांचे गंजबाजारात ‘मिरांडे सराफ’ नावाने सराफी दुकान आहे. सोन्याचे दागीने खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन बुरखाधारी महिला दुकानात आल्या. सोने दागिने पाहताना मिरांडे यांची नजर चुकवून त्यांनी 15 हजार रुपयांचे सोने चोरले.

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दोघींनी तेथून पलायन केले. या महिला गेल्यानंतर मिरांडे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जाधव करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*