अहमदनगर : क्राफ्ट बाजार प्रदर्शनात हॅण्डीक्राफ्ट, हॅण्डलूम व कलात्मक वस्तुंचा खजिना

सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तुंचे क्राफ्ट बाजार प्रदर्शन

0
अहमदनगर : ऑल इंडिया क्राफ्ट ग्रुप, मुंबई यांच्या वतीने प्रोफेसर कॉलनीजवळील सावेडी जॉगिंग ट्रॅकच्या भव्य मैदानावर हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट, गृहोपयोगी व गृहसजावटींच्या वस्तुंचे क्राफ्ट बाजार हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, या प्रदर्शनास नगरकरांबरोबरच जिल्ह्यातूनही चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्राहक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.
या प्रदर्शनात भारतामधील उत्कृष्ट वीणकरांनी तयार केलेल्या पूर्व ते पश्चिम व उत्तर ते दक्षिण भारतातील सर्व कलात्मक हस्तकला, हस्तशिल्प, हॅण्डलूम, हॅण्डीक्राफ्ट व कन्झुमर वस्तुंचे प्रदर्शन व विक्री केली जात आहे.
25 हजारांपेक्षा अधिक उत्पादने या प्रदर्शनात उपलब्ध आहेत.
इंटेरिअर व एक्सटेरिअर, गृह सजावटीचे विविध प्रकार, तसेच लाकडी फर्निचरमध्ये अनेक व्हरायटीज्, पेंटिंग्ज याबरोबरच युवक, युवती, महिला, पुरुष, बालगोपाळ यांच्यासाठी ड्रेस, ज्वेलरी उपलब्ध आहेत. क्रॉकरीचे विविध प्रकार तर महिलांचे आकर्षण ठरत आहेत.
प्रदर्शनात उपलब्ध असलेल्या टेराकोटाच्या अनेक वस्तु तुमच्या घराची शान वाढवत असल्याने ती खरेदीला ग्राहकांचे विशेष प्राधान्य आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात 90% कारागिर स्वत सहभागी असल्याने या वस्तु वाजवी दरात उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री केली जात असल्याने किंमतीही अतिशय कमी आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, जम्मू, काश्मीर, ओरिसा, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, कोलकाता, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या कलाकार व उत्पादक या प्रदर्शनात सहभागी आहेत.
प्रदर्शनात ब्लॉक प्रिंट, ड्रेस मटेरियल, बेटशीटस्, जरीवर्क वस्तु, लखनवी चिकन साड्या, ब्लू आर्ट पॉटरी, लेझर पर्स, खुर्जा क्रॉकरी, सहारनपूर फॅन्सी, अँटीक फर्निचर, टेरा कोटा इमिटेशन ज्वेलरी, प्रिेंटेड सिल्क साडी, मार्बल मंदिरे आदींचा समावेश आहे.
भारतातील हॅण्डलूम व हॅण्डीक्राफ्टची कला, कौशल्य, कृती आणि सौंदर्य या सर्वांचा मिलाफ येथे पहावयास मिळतो. प्रदर्शनात खरेदी करताना डेबिट व क्रेडिट कार्ड स्वीकारण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे प्रदर्शन मर्यादित कालावधीसाठी सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले आहे.

LEAVE A REPLY

*