अहमदनगर : नेहरू पुतळा परिसर स्वच्छ करा

दुरावस्था दूर न केल्यास काँग्रेस आंदोलन करणार : भुजबळ

0

अहमदनगर : येथील लालटाकी टेकडीवर असलेला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा व परिसराची दुरावस्था झाली आहे याबद्दल काँग्रेसच्या ब्लॉक कमेटी अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करून जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीतदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यांत येईल असे ते म्हणाले
या ठिकाणी पूर्वी गुलाबाची बाग , कारंजा . धबधबा होता पण आज या ठिकाणी सगळीकडे कचरा असतो , पंडितजींच्या हातातील माईक गायब असून चौथर्‍याच्या स्टाईल पडून गेल्या आहेत तर असणारे कंपाउंड तुटले आहे व या ठिकाणी असणार्‍या झुडपामुळे रोडवरून हा पुतळा दिसत नाही. दरवर्षी 14 नोव्हेंबर ला प्रशासन व मनपा या ठिकाणी कार्यक्रम घेते पण वर्षोनो वर्ष अशीच स्थिती आहे. या ठिकाणचा जागेचा वाद आहे तर हा पुतळा लालटाकी चौकात अप्पू हत्तीच्या मागील जागेत कारंजाच्या ठिकाणी बसवावा त्यामुळे तो सर्वाना दिसेल व मुलांना त्यातून प्रेरणा मिळेल.

LEAVE A REPLY

*