भिंगार : जुगार अड्ड्यावर छापा; 30 जुगार्‍यांना अटक 

0
अहमदनगर :  भिंगार येथील भिमनगर भागात सुरू असणार्‍या जुगार अड्यावर सहाय्यक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने छापा टाकत 30 जुगार्‍यांना अटक करून त्यांच्याकडील 5 लाख 75 हजार 645 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
मंगळवार दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शिंदे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. भिमनगर भागात रात्री मोठ्या खुलेआम जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
या माहितीवरून भिंगार पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांच्यासह सहाय्यक फौजदार गायकवाड, राजू सुद्रिक,अभिजित अरकल, सागर व्दारके, कर्डक, गोरे, मिसाळ, गणेश चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकला. हा छापा पडताच जुगार चालक आदेश भिंगारदिवे, हा फरार झाला.
दरम्यान पोलिसांनी निलेश रामदास भोसले, किशोर कचुरू शिंदे, जावेद नुरअली अन्सारी, अर्जुनसिंग विठ्ठलसिंग परदेशी, मनिष अर्जुन चांदगुडे, मनोहर बहुमल खुपचंदानी, आकाश सुंदर उबाळे, अन्वर शेखर नजीर, श्रीकृष्ण आसाराम बोरूडे, शहाबाज रहेमान शेख, शिवसिग बन्सी परदेशी, प्रकाश कृष्णा आढाव, शेख अन्वर रफिक, संजय रामदास भोर, प्रणव सुनिल पंचमुखी, योगेश मारूती सोनवणे शिवाजी दिनकर धिवर, राजेंद्र चंद्रकात घोरपडे, राहुल विजय मदने, राहुल लहानू कावरे, राजू लालू पवार, राजू लालू पवार, रामदास विश्वनाथ शिंदे, राजू अशोक सावंत, मधुकर नाथाजी मोहिते, चतुरमल खेराजमल काजल, विजय चांदमल मुनोत, अरूण कान्हू फुलारी, निलेश रामदास भोसले, जावेद नूर आलम अन्सारी,किशोर कचरून शिंदे, प्रविण सुनील पंचमुखी, आदी जुगार्‍यांना पोलिस नाईक राजू सुद्रिक यांनी दिलेल्या फिर्यादवरून अटक करण्यात आली असून या प्रकरणी प्रकरणी भिंगार काँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*