अहमदनगर : बाल कलावंत स्पर्धा महोत्सावचे आयोजन 

0
अहमदनगर : रावसाहेब पटवर्धन स्मारक सामितीच्या वतीने शनिवार व रविवार दि 16,17 डिसेंबर रोजी 19 व्या जिल्हास्तरीय बाल कलांवत संगीत स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आाहे.
या महोत्सवात शास्त्रीय तबला व पखवाज वादन, शास्त्रीय व सुगम गायन, स्वर वाद्य वादन, देशभक्तीपर समुह गीत गायन आदी विविध वयोगटात सदर स्पर्धा होणार होणार असल्याची माहिती समितीचे सचिव गणेश गावडे यांनी दिली.
सदर स्पर्धा पाच कला प्रकारामधून ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा शनिवार व रविवार दि.16 व 17 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्या पासून सुरू होणार आहे.
या स्पर्धातील विजेत्यांना तीन क्रमांकांना अनुकमे प्रथम 1001, व्दितीय 701, तृतीय 501 व दोन उत्तेजनार्थ 151 रूपयांचे रोख बक्षीसे प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्हे देऊन गौरविण्यात येणर आहे.
मागील तीन वर्षात ज्या कलांकरांना स्मारक समिती तर्फे या स्पर्धामध्ये पाहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेल्या स्पर्धाकांना सहभागी होता येणार नाही.
सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मुलांना सहभागी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*