अहमदनगर : महिनाअखेरीस रंगणार बाल एकांकिका महोत्सव

मानकन्हैया ट्रस्ट आयोजित स्पर्धा 23 व 24 डिसेंबरला : डॉ. प्रकाश कांकरिया

0

अहमदनगर : माजी न्यायाधिश व शिर्डी संस्थानचे माजी विश्‍वस्त आणि नगर येथील सुविख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांचे स्वर्गीय पिताश्री कन्हैय्यालालजी कांकरिया यांच्या स्मरणार्थ मानकन्हैय्या ट्रस्ट गेल्या 20 वर्षांपासुन राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सवाचे आयोजन करून कांकरिया करंडक शेकडो रंगकर्मींना आकर्षित करत आहे.

याही वर्षी 23 व 24 डिसेंबर रोजी कांकरिया करंडकाचे आयोजन करण्यात आले असून ठिकठिकाणच्या संघाना नवीन वर्षाची अनोखी भेट प्राप्त होणार आहे. म्हणुनच महाराष्ट्रातील विविध संघानी या स्पर्धेत भाग घेवून आपल्या शहराचा नावलौकिक वाढवावा असे नम्र आवाहन मराठवाडा मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले आहे.

बालएकांकिका महोत्सवाचे सचिव श्री. सदाशिव मोहिते म्हणाले की, अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाट्य क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे. त्याला एक गौरवशाली इतिहास आहे व अनेक राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या रंगभूमीने दिले आहेत. याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट यांनी मागील 20 वर्षांपासून राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव (स्पर्धा) स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती कांकरिया करंडक घेत आहे.

बाल रंगभूमीसाठी समर्पित महाराष्ट्रातील ही एकमेव स्पर्धा आहे. या वर्षी 23 व 24 डिसेंबर शनिवार व रविवार नगर येथील माऊली संकुल सभागृह, सावेडी येथे सकाळी 8 वाजल्यापासुन दिवसभर या स्पर्धा होणार आहेत. या दोन दिवशी बाल गोपाळांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. अनेक विध नैपथ्य, प्रकाशयोजना, संहिता, संवादङ्गेक, अभिनय, रंग व वेशभुषा, पाहिल्यामुळे या विषयीचा चांगला अभ्यास या निमित्ताने होणार आहे. मनोरंजना बरोबरच कलाकाराची जडण-घडण येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त बाल मंडळींनी याचा लाभ घ्यावा. सर्वांसाठी प्रवेश विनामुल्य आहे यांची नोंद घ्यावी असे आवाहन कांकरिया करंडकाच्या स्वागताध्यक्षा डॉ.सौ. सुधा कांकरिया यांनी केले.

स्पर्धा प्रमुख : डॉ. वर्धमान कांकरिया तसेच डॉ. मुकूंद देवळालीकर, श्री. उमाकांत जांभळे, श्री. सुभाष बागूल, श्री. बापुराव पंडीत, कु. स्मिता मोहिते, चि. सौदागर मोहिते, कु, प्रिया सोनटक्के, श्री. निषाद जोशी, श्री. मिलिंद भोगाडे, श्री. रोहित अष्टेकर, मार्गदर्शन : श्री. रमेशचंद्र छाजेड, श्री. किरण कांकरिया, श्री, रमेश बाङ्गना, अनिरूध्द देवचक्के, श्री, धनंजय सरदेशपांडे, अ‍ॅड. सतिष भोपे, श्री. शशिकांत नजन व श्री. दत्ता इंगळे इ. महोत्सवासाठी परिश्रम घेत आहेत.

तरी सर्व स्पर्धकांनी 10 डिसेंबर 2017 पर्यंत संपर्क साधावा असे संयोजक कळवितात.

 

LEAVE A REPLY

*