अहमदनगर : हमाल-मापाडी महामंडळाच्या सहचिटणीसपदी अविनाश घुले

सामाजिक बांधिलकीच्या समर्पित सेवा कार्याची पावती : कॉ. बाबा आरगडे

0

अहमदनगर : राज्यातील नगर जिल्हा हा सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो, यात तालुकास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरु असलेल्या अनेक छोटेमोठे मार्केट व दुकानांमध्ये हमाल, मापाडी, कष्टकारी बांधव रात्रंदिवस काम करत असतो. हमाल, मापाडी, कष्टकरी बांधव हे जिल्हा हमाल पंचायत संघटनेचे सभासद असल्याने त्यांच्याहक्क अधिकाराची लढाई ही हमाल पंचायत या संघटनेच्या अधिपत्याखाली सुरु असते. म्हणून हमाल, मापाडी, कष्टकरी बांधवांचे सर्व समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी काम जिल्हा हमाल पंचायतीच्या माध्यतातून अविनाश घुले करत आहेत ; म्हणून सामाजिक बांधिलीकच्या समर्पित सेवा कार्याची ही पावती असल्याचे प्रतिपादन मार्गदर्शक कॉ.बाबा आरगडे यांनी केले.
पुणे येथे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले यांची सहचिटणीसपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक शेखलाल, सचिव मधुकर केकान, मार्गदर्शक कॉ.बाबा आरगडे, सल्लागार अशोक बाबर, माजी नगरसेवक विष्णूपंत म्हस्के, लक्ष्मीबाई कानडे, रावसाहेब दराडे, बहिरु कोतकर, रामा पानसंबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना अविनाश घुले म्हणाले, कष्टकार्‍यांचे कैवारी आणि कामगारांचे हित लक्षात घेता अ.नगर जिल्ह्यात प्रथमच माथाडी कायदा लागू करण्यात सिंहाचा वाटा असणारे स्व.शंकरराव घुले यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण मार्गक्रम करत आहोत. हमाल, मापाडी, असंघटीत कामगार यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण त्यांचे संघटन करुन जिल्हा हमाल पंचायतच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. आज राजस्तरावर नियुक्ती झाल्याने आता जिल्ह्यातील हमाल-मापाडी यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडून त्यांना त्याचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत, असे त्यांनी सत्कारास उत्तर देतांना सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, शेख रज्जाक, मधुकर केकान, अशोक बाबर आदिंनी शुभेच्छापर भाषण करुन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय महापुरे यांनी केले तर आभार नंदू डहाणे यांनी मानले.कार्यक्रमास पतसंस्थेचे संचालक आशाबाई रोकडे, अशोक जायभाय, अनुरथ कदम, बबन अजबे, नवनाथ बडे, संजय महापुरे, दत्ता़त्रय भोजने, प्रल्हाद बोठे, लक्ष्मण वायभासे, रविंद्र भोसले, सुनिल गिते, पांडूरंग चक्रनारायण, रामा पानसंबळ, संभाजी कोतकर, सुरक्षा रक्षक संघटनेचे पदाधिकारी, इमारत बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी, हमाल-मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*