अहमदनगर : शिवसेना महिला आघाडी सक्षम करणार : महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रिता वाघ

0

अहमदनगर : जिल्ह्यात शिवसेनेचे काम मोठे आहे, त्यामध्ये शिवसैनिकांनी सर्वसामान्य, शेतकर्यांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठविला आहे. आज शिवसेना जरी सत्तेत असली तरी जनतेच्या व शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सरकार विरोधी भुमिका घेतली आहे. यामध्ये महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांही प्रत्येकवेळी आघाडीवर होत्या. नगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना घडल्या; त्यातील पिडीतांना न्याय देण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्यावतीने नेहमीच प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रिता वाघ यांनी केले.
शिवसेना महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख रिता वाघ या नगर जिल्हा दौर्‍यावर आल्या असता त्यांच्या हस्ते शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे आरती करण्यात आली. याप्रसंगी महापौर सुरेखा कदम, विभागप्रमुख संध्या सावंत, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, सुषमा पडोळे, निर्मला धुपधरे, संगीता ससे, उषा ओझा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर कदम म्हणाल्या, आज शिवसेनेने महिलांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला आहे. शिवसेनेने महिलांना नेहमीच प्रोत्साहन देऊन विविध पदे दिले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी पक्ष पातळीवर मोठे प्रयत्न होत आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरही जिल्ह्यातील महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न असून, त्या माध्यमातून सर्वसामान्यांबरोबरच महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी विभाग प्रमुख संध्या सावंत यांनी जिल्ह्यातील दोन दिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.

LEAVE A REPLY

*