अहमदनगर : आयआयटी मुंबई रेडियन्स 2018 कार्यशाळा न्यू आर्टस् महाविद्यालयात

0

अहमदनगर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आय.आय.टी. मुंबई रेडिसन्स कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पदव्युत अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ही कार्यशाळा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या युगात स्वत: तयार केलेल्या अ‍ॅप्लीकेशनचा दररोजच्या वापरात उपयोग करावा. पुणे, मुंबई येथील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये घेतल्या जाणार्‍या रेडियन्स कार्यशाळेचे अहमदनगरमध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे यांनी केले.
या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील विविध विभागातील 75 विद्यार्थी सहभागी झाले आहे. आयआयटी मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आय.आय.टी.च्यावतीने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी रेडियन्स 2018 कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या मध्यमातून नवीन तंत्रज्ञान, संगणक क्षेत्रातील नवीन संशोधन, प्रत्यक्ष महाविद्यालयात जावून शिकविले जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी स्थानिक पातळीवर वैज्ञानिक ज्ञानावर आधारित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्थानिक पातळीवरील स्पर्धेतील विजेत्याला आय. आय. टी. मुंबईच्या मुख्य कार्यक्रमासाठी निमंत्रीत केले जाणार आहे. सहभागी होणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती विभागप्रमुख प्रा.अरुण गांगर्डे यांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन उपप्राचार्य डॉ.ए. के. पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली बी. सी.ए. (सायन्स) विभागप्रमुख प्रा.अरुण गांगर्डे व विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

*