रात्रीस… खेळ चाले! : मंदिर पाडापाडी

0

अहमदनगर : नागरिक व हिंदुत्ववादी संघटनांचा रोष पाहता महापालिका प्रशासन रात्रीच्या अंधारात मंदिरावर घाव घालत आहे. रात्रभर कारवाई करून पहाटेच्या सुमारास ती थांबविली जाते. अनधिकृत मंदिरावरील कारवाईचा ‘रात्रीस खेळ चाले..’ पध्दतीने सुरू असून आतापर्यंत महापालिकेने 17 मंदिर भूईसपाट केली आहे. कारवाई दरम्यान कोणी जेसीबीसमोर झोपतं तर कोणी रडागागी करतं आहे. मात्र पोलिसी खाक्यासमोर नागरिकाही आता नरमले आहेत.

रविवारी रात्री स्टेशन रोड, सांगळे गल्लीमधील पाच मंदिरे मनपाने हटविले. रविवाररात्री 11 वाजेच्या सुमारास स्टेशन रोड परिसरातून कारवाईला सुरूवात झाली. रात्री 10 वाजेच्या सुमारास महापालिका कर्मचारी मुख्य इमारतीमध्ये जमा झाले. रात्री पावणे अकराच्या सुमारास कारवाईसाठी बंदोबस्त मिळाल्यानंतर लवाजमा मोहीमेवर निघाला. रेल्वे स्टेशन परिसरातील मल्हार चौकात असलेल्या मारूती मंदिरात लवाजमा पोहचला.   मंदिरातील साहित्य काढून घ्या, अन्यथा आम्हाला काढावे लागेल, असे तेथील नागरिकांना सांगण्यात आले. फौजफाटा पाहत उपस्थितीत युवकांनी मंदिरातील साहित्य काढण्यास सुरूवात केली. मंदिरातील वीज पुरवठा बंद केल्यानंतर जेसीबीने पहिला घाव मारला. बांधकाम पूर्णपणे आरसीसी असल्याने मंदिर भुईसापाट होता होता सव्वा एक वाजला. त्यानंतर लवाजमा शिवनेरी चौकातील गवळीवाडा परिसरात पोहचला. लक्ष्मी माता मंदिर परिसरातील नागरिकांनी ‘आम्ही आयुक्तांना भेटलो, पुरावे देखील दिले आहे. त्याचा विचार करावा असे सांगण्यात आले. मात्र मंदिर रस्त्यावर येत असल्याने अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. रात्री दीड च्या सुमारास मंदिरातील मुर्ती काढून तेथील नागरिकांच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर पावणे दोनच्या सुमारास मनपाच्या जेसीबीच्या सहाय्याने हातोडा टाकण्यात आला. पहाटे तीन वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

मूर्ती ठेवा मंदिर पाडा
शिवनेरी मंदिरातील मूर्ती आहे त्याच जागेवर ठेवा, मंदिर पाडायचे तर पाडा अशी भूमिका एका महिलेने घेतली. मात्र न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे असे काही करता येणार नाही. मुर्ती हवी असल्यास ती व्यवस्थितीत काढून ताब्यात देऊ असे प्रशासनाने या महिलेस सुनावेल. या उत्तराने महिलेला रडू कोसळले. रडागागी करणार्‍या या महिलेस महिला पोलिसांनी ताब्यात घेत बाजुला नेले. मूर्ती उपस्थित नागरिकांच्या ताब्यात दिल्यानंतर कारवाई सुरू झाली.

  • मल्हार चौकात तणाव  : मल्हार चौकातील मारूती मंदिरावर कारवाई सुरू असतांना उपस्थितीत युवकांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला . सहाय्यक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी जमावाला शांततेचे आव्हान केले. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. कारवाईला अडथळा आणू नये. काही तक्रार असेल तर महापालिकेत तक्रार करावी किंवा कोर्टात जावे, अन्यथा आम्हाला कायदेशी कारवाई करावे असे सुनावले. पोलीस कारवाईच्या भितीने जमाव शांततेत पांगला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधारात शेजारच्या टपरीवर दगड पडला. त्यानंतर दगडफेकीची अफवा पसरली. पोलिसांनी तो भाग पिंजून काढला. त्यानंतर कारवाई सुरू झाली.
  • मारुतीसाठी तो झोपला  मारूती मंदिरावर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई सुरू होताच जमावामधील गणेश राऊत नावाचा तरूण  थेट जेसीबीच्या समोर झोपला. त्यामुळे काही काळ मोहीम थांबविण्यात आली. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर कारवाई सुरू झाली.
  •  सव्वा तीन वाजेच्या सुमारास लवाजमा शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदिरावर कारवाई करण्याकडे रवाना झाला. सांगळे गल्लीतील तीन मुंजोबा मंदिरावर पावणे चारच्या सुमारास कारवाईला सुरूवात करण्यात आली. या गल्ली मधील अंतर्गत रस्ते छोटे असल्यामुळे या ठिकाणी फक्त एकाच मंदिर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. राहिलेले दोन छोटे मंदिरे कर्मचार्‍यांच्या मदतीने पाडून तेथील मुर्ती उपस्थितीत नागरिकांना ताब्यात देण्यात आले. पहाट झाल्यानंतर ही कारवाई येथेच थांबविण्यात आली.

LEAVE A REPLY

*