अहमदनगर : पाडापाडीला ‘ब्रेक’अप

दोन दिवसांत गनिमी काव्याने पार पडणार मोहीम

0

अहमदनगर : एकीकडे कोर्टाचा दट्ट्या अन् दुसरीकडे लोकांचा रोष अशा दुहेरी संकटात सापडलेल्या महापालिकेला धार्मिक स्थळांवरील कारवाई मोहीम थांबवावी लागली आहे. त्यातच आयुक्त घनशाम मंगळे हे प्रदीर्घ रजेवर गेल्याने पाडापाडीची मोहीम ब्रेकअप झाली. मात्र येत्या दोन गनिमी काव्याने कारवाई होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

वाहतूकीस अडथळा ठरणारी व रस्त्यात असणारी धार्मिक स्थळे पाडण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शासनाने कोर्ट ऑर्डरनुसार 17 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदत दिली आहे. महापालिकेने घाईघाईत केलेल्या सर्व्हेला हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला. तरीही महापालिकेने 7 मंदिरावर हतोडा टाकला. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी महापालिकेवर धार्मिक भेदाभावाचा आरोप करत कारवाईस आक्षेप घेतला. सत्ताधारी नगरसेवकही प्रशासनाच्या विरोधात उरतले. त्यामुळे महापालिकेवर दबाव वाढला.
महापालिकास्तरीय समितीच्या बैठकीत गरमागरमी झाली. त्यानंतर मोहीम थांबली ती थांबलीच. आयुक्तही प्रदीर्घ रजेवर गेले. त्यामुळेच धार्मिक स्थळं पाडण्याची मोहीम ब्रेकअप करावी लागली.पहिल्या टप्प्यात 68 धार्मिक स्थळं पाडली जाणार आहे. त्यातील 7 पाडली देखील. मात्र, 68 अनधिकृत धार्मिक स्थळांमध्ये फक्त हिंदुचीच मंदिर असल्याचा आरोप झाल्याने अन् त्यातही सत्यता नजरेस येत असल्याने नागरिकांचा रोष महापालिकेला परवडणारा नव्हता. त्यामुळेच मोहीम ब्रेकअप करावी लागल्याची चर्चा आहे.

  • राज्यस्तरीय समितीकडे 31 अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्याचा प्रस्ताव महापालिकेने पाठविला आहे. त्याच्या मंजुरीनंतरच ही कारवाई होईल. या 31 स्थळांमध्ये काही इतर धर्माची स्थळे आहेत. त्यातील काही पाडली तर जातीयभेदाचा आरोप पुसला जाईल असे महापालिका प्रशासनाला वाटते. राज्यस्तरीय समितीच्या मंजुरीची प्रतीक्षा महापालिकेला आहे. मंजुरी मिळताच त्यांचेही धार्मिक स्थळं हटविले जातील. पाडापाडी मोहीम बॅलन्स होईल असे प्रशासनाला वाटते.
  • तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडुरंग पवार यांची बदली झाली. त्यांच्या जागी सुरेश सपकाळे यांची नियुक्ती झाली. या अदलाबदलीमुळे महापालिकेला पोलीस बंदोबस्त मिळणे अवघड झाले. कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत मोहीम राबविली जाण्याच्या तयारीत महापालिका प्रशासन असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
  • कारवाईचा अहवाल 17 तारखेला शासनाला सादर करावयाचा आहे. तोपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळं पाडणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव मोहीम थांबली आहे. ती पुन्हा सुरू होईल. राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव मंजुरीला गेला असून त्यांच्या मंजुरीची वाट पाहत आहोत.कारवाईचा अहवाल 17 तारखेला शासनाला सादर करावयाचा आहे. तोपर्यंत अनधिकृत धार्मिक स्थळं पाडणे गरजेचे आहे. मात्र काही कारणास्तव मोहीम थांबली आहे. ती पुन्हा सुरू होईल. राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव मंजुरीला गेला असून त्यांच्या मंजुरीची वाट पाहत आहोत.– सुरेश इथापे अतिक्रमण प्रतिबंध, विभागप्रमुख

LEAVE A REPLY

*