अहमदनगर : रात्रीस… खेळ चाले! : साहेब, कुत्रे आवरा

0

अहमदनगर : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस निखील वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, विद्यार्थ्यांनी साहेब, शहरातील कुत्रे आवरा, अशी गळ अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांना घातली. महापालिका इमारतीत फुटबॉलचा खेळ मांडून त्यांना कुत्र्याचे पिल्लूही भेट दिले. प्रशासन अपयशी ठरत असेल तर पत्नी रूपाली वारे नगरसेवकपदाचा राजीनामा देईल, असा इशारा निखिल वारे यांनी यावेळी दिला.

शहरात मोकाट कुत्रे पकडण्याची महापालिकेची मोहीम थांबल्याने सुळसुळाट झाला आहे. हॉटेलमधील उष्टे खाऊन कुत्रे लहान मुलांवर हल्ला करत आहे. शनिवारी रात्री सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील नित्यसेवा परिसरातील पूर्वा क्यादर व क्षिजीत गिरी या दोन मुलांना कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिक व शालेय मुलांन महापालिकेवर आज (सोमवारी) मोर्चा काढला. मोकाट कुत्रेही महापालिकेत सोडली. मैदानावर फुटबॉल खेळत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यात आला. अखेर महापालिकेने लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या क्यादर व गिरी या दोन मुलांच्या उपचाराचा खर्च महापालिका करणार आहे. आंदोलनानंतर ठेकेदाराचे बिल दिले जाणार नाही तसेच त्याला काळ्या यादीत टाकण्यात येईल असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

  • हंगामी कर्मचारी पकडणार कुत्री हंगामी कर्मचारी पकडणार कुत्री ठेकेदाराने काम बंद केल्याने महापालिका आता पर्यायाच्या शोधात आहे. हंगामी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करून त्यांच्या मार्फत मोकाट कुत्री पकडली जाणार आहे. येत्या दोन दिवसांत हंगामी कर्मचार्‍यांच्या नियुक्ती केल्या जातील असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी सांगितले.
  • निर्बिजीकरण केंद्राचा रस्ता खचला महापालिकेने पिंपळगाव माळवी येथे श्‍वान निर्बिजीकरण केंद्र सुरू केले आहे. शहरात पकडलेली कुत्रे तेथे नेऊन त्यांचे निर्बिजीकरण केले जाते. मात्र केंद्रात जाणारा रस्ता खचला आहे. पकडलेले कुत्रे घेऊन जाणारे वाहन केंद्रापर्यंत पोहचू शकत नाही. चार दिवसांपूर्वीच आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकार्‍यांची त्याची पाहणीदेखील केली. त्यानंतर बांधकाम विभागाला मुरूम टाकून रस्ता तात्पुरता सुरू होईल या पध्दतीने काम करण्याची सूचना दिली.
  •  फक्त 50 श्‍वानांचे निर्बिजीकरण : शहरात हजारो मोकाट कुत्रे आहेत. महापालिकेने आजपर्यंत फक्त 50 मोकाट श्‍वानांचे खच्चीकरण केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. श्‍वान पकडण्याची मोहीम ठप्प असल्याने निर्बिजीकरण थांबल्याचे सांगण्यात आले.
  • मोकाटाचा भार अधिकार्‍यांच्या माथी :   शहरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी स्वच्छता निरीक्षक, कोंडवाढा विभाग प्रमुखांवर टाकण्यात आली आहे. मोकाट कुत्र्यांमुळे कोणी जखमी झाले अगर हल्ला झाला तर त्याची जबाबदारी ही संबंधित अधिकार्‍यांवर टाकली आहे.

 

LEAVE A REPLY

*