अहमदनगर : 11 ते 14 जानेवारी दरम्यान रंगणार महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

0
अहमदनगर : अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट प्रायोजित व श्री. महावीर प्रतिष्ठान आयोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा नगरमध्ये दि. 11 ते 14 जानेवारी 2018 दरम्यान येथील माऊली सभागृह, माऊली संकुल, झोपडी कॅटीन शेजारी, सावेडीरोड, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे हे सहावे वर्षे आहे. यंदाच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 26 डिसेंबर ते 6 जानेवारीला होणार असून, याच फेरीत अंतिम फेरीसाठीचा संघ निवडले जाणार आहे, अशी माहिती नरेंद्र फिरोदिया व स्वप्निल मुनोत यांनी दिली.
ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मराठी एकांकिकांसाठी मर्यादित असून, महाराष्ट्रातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी खुली आहे. रंगभुमीवरील हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी  अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन दि. 11 जानेवारी 2018 रोजी स. 9 वा.  माऊली सभागृह येथे होईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दि.14 जानेवारीला पार पडेल.
स्पर्धेसाठी 1 हजार रुपये प्रवेश शुल्क असून, ते ऑनलाईनच भरावयाचे आहे. एकूण 25 एकांकिका अंतिम फेरीकरीता निवडल्या जाणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज Mahakarandak.com या संकेत स्थळावर उपलब्ध असून, ते 20 डिसेंबर 2017 अखेर भरणे बंधनकारक आहे. प्रत्येक संघाला एकांकिका सादर करण्यासाठी 1 तासाचा कालावधी दिला जाणार आहे. प्रत्येक संघास सहभागाचे स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र ही प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील पारितोषिके :
सांघिक पारितोषिके : प्रथम क्रमांक 71 हजार 111 रुपये, अहमदनगर महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्र. 51 हजार 111 रुपये, करंडक आणि प्रमाणपत्र, तृतीय क्र. 31 हजार 111 रुपये करंडक आणि प्रमाणपत्र, चतुर्थ क्र. 21 हजार 111 रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. उत्तजेनार्थ 5 हजार 111 रुपये सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका 11 हजार 111 रुपये करंडक आणि प्रमाणपत्र त्याचप्रमाणे यावर्षी नगरच्या संघांसाठी विशेष पारितोषिकही देण्यात येणार आहेत.
वैयक्तिक परितोषिके : दिग्दर्शन – प्रथम 2 हजार 111 रुपये, द्वितीय- 1 हजार 111 रुपये, तृतीय – 711 रुपये, उत्तेजनार्थ – 311 रुपये आणि सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. अभिनेता/अभिनेत्री प्रथम- 1111 रुपये, द्वितीय 711, तृतीय – 511, उत्तेजनार्थ – 311 रुपये. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. यासह सहअभिनेता/अभिनेत्री, खलनायक / खलनायिका, विनोदी कलाकार, बाल कलाकार, प्रकाश योजना/ संगीत/ नेपथ्य, रंगभुषा/वेषभुषा, लेखन अशी विविध भागासाठी रोख रकमेची बक्षिसे, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रासह दिली जाणार आहेत.
या वर्षी होणार्‍या स्पर्धेत अहमदनगर महाकरंडकतर्फे काही निवडक एकांकिकांना अंतिम फेरीसाठी निमंत्रित करण्यात येणार आहे. या एकांकिका थेट अंतिम फेरीत सादर होतील. याबाबतचे सर्व नियम अहमदनगर महाकरंडकच्या संयोजकांकडे असेल.

LEAVE A REPLY

*