अहमदनगर : युवा खेळाडूंसाठी आयोजित फुटबॉल प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद       

0

अहमदनगर : शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशन व शिवाजीयन्स फुटबॉल क्लबतर्फे नुकत्याच झालेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेतील निवडक गुणवंत खेळाडूंना उच्चस्तरीय फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण देण्याचे शिबीर सुरु झाले असून त्यास युवा खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

अहमदनगर कॉलेजच्या मैदानावर आठवड्यातील तीन दिवस शुक्रवार,शनिवार व रविवार दुपारी चार ते सहा यावेळेत मुलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.पुणे व नगर येथील राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय फुटबॉल मार्गदर्शक ,तज्ञ १२,१४, व १६ वयोगटातील फुटबॉलपटूना उत्तम प्रशिक्षण देत आहेत.

नगर मधील विविध शाळातील निवडक विध्यार्थ्यांना या प्रशिक्षणचा फायदा होत असून राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू निर्माण होण्यासाठी हे शिबीर आयोजित केल्याचे श्री.शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशनचे चीफ ट्रस्टी श्री. नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.

योग्य वयात मुलाना मार्गदर्शन भेटले तर भविष्यात ते खेळात यशस्वी होतात,म्हणूनच फुटबॉल मधील चांगली कामगिरी करणाऱ्या या मुलांना फुटबॉल खेळाचे बारकावे समजावेत,त्यांचा स्टॅमीना वाढावा याकडे विशेष लक्ष या शिबिरात देण्यात येईल. या प्रशिक्षण शिबिरातील खेळाडूना शिवाजीयंस क्लब मार्फत विविध फुटबॉल स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल,  अशी माहिती शिवाजीयन्स फुटबॉल क्लबचे मनोज वाळवेकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

*