नगरच्या डेंटिस्टची स्माईली!

बेस्ट सॉयन्टीफिक अ‍ॅक्टीव्हीटी बाय एक लोकल बँ्रच पुरस्कार

0

अहमदनगर : नगरच्या दंतवैद्यकीय शाखेच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या उपक्रमाची दखल घेत ‘राज्यस्तरीय बेस्ट सॉयन्टीफिक अ‍ॅक्टीव्हीटी बाय एक लोकल बँ्च’ पुरस्कार जाहीर झाला आहे.

नगर शाखेने लहान मुलांची दंत तपासणी, ज्येष्ठ नागरिक, कामगार, झोपडपट्टी अशा विविध ठिकाणी दंत आरोग्य शिबीराच्या माध्यमातून दंत तपासणी केली. ऑगस्ट महिन्यात अध्यक्षा डॉ.प्राची पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी येथे झालेली राष्ट्रीय दंत वैद्यकीय परिषद यशस्वी करून दाखविली. व्यवसाय करताना समाजिक जाणिवेतून उपक्रम राबविणे गरजेचे आहे, ही भावना शाखेने जपली आहे. त्यामुळे आज हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असल्याचे नगर शाखेचे अध्यक्ष डॉ. हुजेफा बोहरी यांनी सांगितले.

जिल्हा दंत वैद्यकीय शाखेचे पदाधिकारी व सदस्यांनी एकत्र येऊन पुरस्कार मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. डॉ.प्राची पाटील, डॉ. मुस्कान तलरेजा, डॉ. स्वरुपकुमार मगर, डॉ.हुजेफा बोहरी, डॉ.अविनाश वारे, डॉ.विनोद मोरे, डॉ.विवेकानंद चेड, डॉ.मंगेश जाधव, डॉ.अभिजित मिसाळ, डॉ.ओंकार कुलकर्णी, डॉ.डी.डी.पंडित, डॉ. प्रमोद निक्रड,डॉ. ओंकार भालसिंग, डॉ. किरण माचवे, डॉ. कुणाल कोल्हे, डॉ. निळकंठ म्हस्के, डॉ. ममता डुंगरवाल, डॉ. किरण खांडे, डॉ. कुणाल सुपेकर, डॉ. वर्षा कर्पे, डॉ. जाजू, डॉ.सोनिया औटी, डॉ. स्वाती चंगेडिया, डॉ. मंजुषा गांधी, डॉ. रुही सय्यद यावेळी उपस्थित होते.

8 डिसेंबर 2017 रोजी पुणे येथे राज्यस्तरीय दंत वैद्यकीय परिषदेमध्ये हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*