अहमदनगर : डान्स युनिर्व्हसलच्या टीमची श्रीलंका येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
अहमदनगर : शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रीय डान्स ऍण्ड म्युझिक स्पर्धेत नगरमधील डान्स युनिर्व्हसल इन्स्टीट्यूटच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या संघाची श्रीलंका येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत डान्सच्या सोलो व ड्युएट प्रकारातही इन्स्टीट्युटच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत सुवर्ण तसेच रौप्य पदकांची कमाई केली.
स्पर्धेतील विजेत्यांना भारतीय डान्स ऍण्ड म्युझिक असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मुंडे यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य डान्स ऍण्ड म्युझिक असोसिएशनचे अध्यक्ष नितीन मनवर, उपाध्यक्ष शिवाजी झांबरे, परिक्षक उमेश पारखेडे, प्रकाश पंडित, सुजित चौधरी, डान्स युनिर्व्हसलचे सागर अलचेट्टी आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत समूह नृत्य स्पर्धेत डान्स युनिर्व्हसलच्या टिमने उत्कृष्ट व वैशिष्टयपूर्ण सादरीकरण करून परिक्षक तसेच प्रेक्षकांची मने जिंकली.
प्रथम क्रमांक विजेत्या या संघात सानिया सय्यद, खुशी ग्रोवर, इशिता उमरेडकर, अंकिता गुडुप, आचल चनेजा, वैष्णवी भावसार, श्रावणी घोडके, माही खंडेलवाल, सायली ढोले, तनिष्का भोसले, राज परदेशी, यश सांगळे, वैष्णवी देरे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना सागर अलचेट्टी, आदिती उंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिर्डीतील राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद पटकावणार्‍या डान्स युनिर्व्हसलच्या संघाची श्रीलंका येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिर्डीतील या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश, पंजाब, दिल्ली, उत्तरप्रदेश, कर्नाटक या राज्यातून आलेल्या सुमारे 450 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

*