अहमदनगर : कलेक्टर ऑफिससमोर जागरण गोंधळ

मंदिर बचाव समितीचे आंदोलन

0

अहमदनगर : शहरातील धार्मिक स्थळांचे फेरसर्व्हेक्षण करा या मागणीसाठी मंदिर बचाव कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जागरण गोंधळ घातला. लोकमान्यता पावलेल्या मंदिरांना कारवाईतून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापालिकास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठक सुरू असतानाच मंदिर बचाव कृती समितीने बाहेर जागरण गोंधळ घालून आंदोलन केले. वसंत लोढे, सदाभाऊ शिंदे यांनी कलेक्टरांना निवेदन दिले. महापालिकेच्या धार्मिक स्थळांवर कारवाई चुकीच्या पध्दतीने सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी चुकीच्या माहितीच्या आधारे हिंदू धर्मियांची मंदिरे रात्रीतून पाडत आहेत. अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही मोहीम सुरूच आहे. हिंदुची कोणतीच मंदिरे ही अडथळा ठरणारी नाहीत असा दावा लोढा, शिंदे यांनी केला आहे. ही मंदिर जुनी व लोकमान्यता पावलेली असल्याने ती कारवाईतून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*