अहमदनगर : सीए शाखेतर्फे जागतिक अकौंटन्सी दिन साजरा

अ.ए. सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक अकौंटन्सी दिन साजरा. देशाच्या आर्थिक स्वास्थ्या साठी कॉमर्स क्षेत्रात सीएंचे चे योगदान अतुलनीय : सीए.सी.एल.मध्यान

0

 

अ.नगर सीए शाखेतर्फे अ.ए. सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 10 नोव्हेंबर जागतिक अकौंटन्सी दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना मध्यान म्हणाले कि, देशात होणारे बदल, नवीन जीएसटी प्रणाली, वाढते करदाते यामुळे भविष्यात सीए क्षेत्रात कार्य करण्याची युवकांना चांगली संधी उपलब्ध आहे.भविष्यात लाखो सीएंची गरज असून अत्यंत कमी खर्चात सीए पदवी प्राप्त करता येते.

इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत येणारा प्रचंड खर्च व त्यानंतर मिळणारे उत्पन्न याचा विचार करता अत्यंत कमी खर्चात सीए होऊन चांगले पॅकेज मिळू शकते. सध्या बदलत्या काळात पालकांची भूमिकाही बदलत असून सीएना जागतिक स्तरावर काम करण्यासाठीचीही संधी मिळू शकते. त्यामुळे विदयार्थ्यांनी सीए क्षेत्र निवडून स्वतःचे भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.

सीए शाखेचे अध्यक्ष सीए प्रसाद भंडारी यांनी प्रास्ताविक केले. व जागतिक अकौंटन्सी दिनाचे महत्व विशद केले. कॉमर्स विषयी असलेले गैरसमज दूर व्हावे, या क्षेत्रातील नवीन संधींची माहिती व्हावी या हेतूने हा दिवस साजरा करण्यात येत आहे. आज देशविकासात सीए महत्वाची भूमिका बजावत असून फॉरेन्सिंक अकाऊंटन्सी या नवीन क्षेत्रात सीएना प्रचंड काम करण्याची संधी आहे. या कार्यक्रमासाठी अ.ए.सोसायटीच्या छायाताई फिरोदिया यांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमास विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

यावेळी अ.ए. सोसायटीच्या श्रीमती छायाताई फिरोदिया, सीए नगर शाखेचे उपाध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी, सीए सुशील जैन, सीए विजय मर्दा, सीए मोहन  बरमेचा, सीए संजय देशमुख , प्राचार्य प्रभाकर भांबड, मुख्याध्यापक उल्हास दुग्गड व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*