अहमदनगर : आगरकर समर्थक खवळले

गायकवाडच सावेडी मंडल प्रमुख : रात्रीच्या बैठकीत ठराव

0

अहमदनगर : विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्या मंडलाच्या अध्यक्ष बदलाच्या कृतीवर आगरकर समर्थक चांगलेच खवळले आहेत. भाजप घटनेनुसार चालणार पक्ष असून ‘सिलेक्टेड’वर चालत नाही, असा टोमणा मारत गांधी यांच्यावर निशाणा साधण्यात आला. सावेडी मंडलाध्यक्ष नियुक्तीवरून गांधी विरुध्द आगरकर असा सामना रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

माजी शहरजिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर समर्थक असलेले सावेडी भाजप मंडलाचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या उचलबांगडीपूर्वीच खासदार दिलीप गांधी विरोधात आगरकर समर्थक एकवटले आहेत. बाळासाहेब गायकवाड हेच सावेडी मंडलाचे अध्यक्ष असून, पुढेही राहतील. सावेडी मंडलात फेरबदल करू नये असा ठराव सावेडी मंडलाच्या पदाधिकार्‍यांनी घेतला आहे. बुधवारी रात्री सावेडीत झालेल्या बैठकीत हा ठराव घेतल्याची माहिती मुकुल गंधे यांनी ‘नगर टाइम्स’ला दिली.

अ‍ॅड अभय आगरकर भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष असताना त्यांनी सावेडीत बाळासाहेब गायकवाड, भिंगारमध्ये महेश नामदे, केडगावात बाळासाहेब विधाते यांची मंडलाध्यक्ष म्हणून निवडी केल्या. विशेष म्हणजे या निवडी पक्षाच्या घटनेनुसार निवडणुकीने करण्यात आल्या.

खासदार दिलीप गांधी यांच्याकडे पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी केडगाव, भिंगारचे आगरकर समर्थक भाजप घटनेनुसार चालतो व्यक्तीनुसार नाही भाजप पक्ष हा घटनेनुसार चालणार पक्ष आहे. कोणत्या व्यक्तीच्या मर्जीनुसार चालत नाही. मंडलाध्यक्ष बदलण्याचा खासदार गांधी यांना अधिकार काय? असा सवाल उपस्थित करत नाशिकच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी गांधी यांना बदलासंदर्भात कोणतीही सूचना केलेली नाही. गांधी यांनी नवीन अध्यक्ष बदलताना जुन्या अध्यक्षनांना काढल्याचे कोणतेही लेखी दिलेले नाही. तोंडीदेखील सांगितलेले नाही. त्यामुळे गायकवाड हेच अध्यक्ष राहतील असा ठराव यावेळी घेण्यात आला.

मंडलाध्यक्षांची उचलबांगडी करत तेथे अनुक्रमे शरद ठुबे व शिवाजी दहिहंडे यांची नियुक्ती केली. या दोघांनाही नियुक्तीपत्र दिले आहे. ते इलेक्टेड नाही तर सिलेक्टेड आहेत असे सांगत या नियुक्त्या बेकायदा असल्याचा दावा गंधे यांनी केला आहे.
सावेडी मंडलाच्या 40 पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सावेडीत गुप्त ठिकाणी घेण्यात आली. बैठकीचे निरोप नगरसेविका मनिषा बारस्कर-काळे यांचे पती राजेंद्र काळे यांनी सर्वांना दिले होते. काही जण वैयक्तिक कारणामुळे आले नाहीत पण आम्ही तुमच्यासोबत असल्याचे निरोप त्यांनी दिले. नगरसेविका उषा नलावडे, मंडलाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, गणेश केदारी, भगवान औटी, सुमीत बटुळे, योगेंद्र सोनवणे, मीरा कुलकर्णी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या अजेंड्यावर सावेडी मंडल बारखास्तीबाबतचा विषय होते. त्यावर चर्चा होऊन मंडल बारखास्त होणार नाही. गायकवाड हेच अध्यक्ष असतील असा निर्णय झाला. तसा ठराव करण्यात आला असून तो प्रदेश समितीकडे पाठविला जाणार आहे.

  • भाजप घटनेनुसार चालतो व्यक्तीनुसार नाही
    भाजप पक्ष हा घटनेनुसार चालणार पक्ष आहे. कोणत्या व्यक्तीच्या मर्जीनुसार चालत नाही. मंडलाध्यक्ष बदलण्याचा खासदार गांधी यांना अधिकार काय? असा सवाल उपस्थित करत नाशिकच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी गांधी यांना बदलासंदर्भात कोणतीही सूचना केलेली नाही. गांधी यांनी नवीन अध्यक्ष बदलताना जुन्या अध्यक्षनांना काढल्याचे कोणतेही लेखी दिलेले नाही. तोंडीदेखील सांगितलेले नाही. त्यामुळे गायकवाड हेच अध्यक्ष राहतील असा ठराव यावेळी घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*